चिरंजीवींना कॅन्सर झाल्याच्या केवळ अफवा

हैदराबाद : समाजमाध्यमांवर अफवा काही सेकंदात व्हायरल होतात. एखादा सेलिब्रिटी जीवंत असतानाच समाजमाध्यमांवर त्याच्या निधनाची बातमी आल्याने चाहते शहानिशा न करता लगेच श्रद्धांजली वाहायला लागतात. अशीच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीविषयी त्याला कॅन्सर झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र ही गोष्ट चुकीची असल्याची माहिती खुद्द चिरंजीवी यांनी ट्विट करत दिली.


चिरंजीवीने ट्विट केलं आहे की,"गेल्या काही दिवसांपूर्वी कॅन्सर सेंटरचं उद्घाटन करताना मी म्हणालो होतो की, कॅन्सरबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही नियमित वैद्यकीय चाचण्या केल्या तर तुमचा बचाव होऊ शकतो. त्यामुळेच मी कोलन स्कोप चाचणी केली. या चाचणीत नॉन-कॅन्सरस पॉलीप्सचं निदान झालं आणि नंतर ते काढण्यात आलं. त्यावेळी मी एवढचं म्हणालो होतो की,त्यावेळी चाचणी केली नसती तर कॅन्सर झाला असता. म्हणूनच प्रत्येकाने सावध राहून चाचणी करुन घेतली पाहिजे".





त्यांच्या आधीच्या ट्विटबद्दल गैरसमज करुन घेत चुकीची माहिती पसरवल्याने चाहते घाबरले व दुखावले गेले. चिरंजीवी यांच्याबाबत असे समोर आले होते की त्यांना कॅन्सर झाला होता आणि उपचारानंतर कॅन्सर बरा झाला. मात्र या सर्व अफवा असल्याचे चिरंजीवी यांच्या पोस्टमधून स्पष्ट होत आहे. अशी अफवा पसरवणाऱ्यांबाबत त्यांनी संताप व्यक्त केला.


अफवांमुळे माझ्या अनेक हितचिंतकानी मला चांगल्या आरोग्यासाठी मेसेज पाठवले, त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी हे स्पष्टीकरण दिल्याचे चिरंजीवी यांनी म्हटले. तसेच विषय समजून घेतल्याशिवाय मूर्खपणे काहीही लिहू नका असे आवाहन त्यांनी माध्यमांना केले आहे.


चिरंजीवी हे लवकरच 'भोला शंकर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मेहेर रमेश यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा ॲक्शनपट असेल. यामध्ये तमन्ना आणि किर्ती सुरेश यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Comments
Add Comment

Chamoli Tunnel Tragedy : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बोगदा दुर्घटना, ७ ठार आणि ३ अद्याप बेपत्ता

चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सात

Road Accident : नैनितालमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्यामुळे २० पर्यटक जखमी

नैनिताल : चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातील दुर्घटनेला २४ तास होण्याआधीच उत्तराखंडमध्ये आणखी एक मोठी

Samay Raina : समय रैनाला मोठा दिलासा; दिव्यांगांवरील असंवेदनशील टिप्पणीप्रकरणी सर्व एफआयआर सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली : विनोदी कलाकार समय रैना याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिव्यांग व्यक्तींविषयी

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील वसतिगृहात सहा मुलींना सर्पदंश, NHRC ने घेतली दखल

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रम शाळेच्या वसतिगृहात अनुसूचित जमातीच्या सहा

PM Vishwakarma Scheme : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी ‘विशेष अतिथी’

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला

Gallantry and Service Medal : देशातील पोलीस, अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांच्या १०५७ जणांना पदके जाहीर

नवी दिल्ली : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे औचित्य साधून देशातील पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक, नागरी