प्रवाशांनी भरलेली बस पलटी, चालकाची प्रकृती गंभीर

धाराशिव : ओडिशामध्ये तीन ट्रेनच्या झालेल्या भीषण अपघाताने देश हादरून गेला असतानाच महाराष्ट्रातही झालेल्या दोन अपघातांनी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.


मध्यरात्री एकच्या सुमारास दुसऱ्या टप्प्यातील समृद्धी महामार्गावर पहिला भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू तर अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर आज सकाळी धाराशिवमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाली. त्यात २६ प्रवासी जखमी झाले आहेत.


चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांना बार्शी येथे हलवण्यात आले आहे. तर इतर सर्वांवर परांडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


धाराशिव जिल्ह्यातल्या सोनगिरी चाकूला येथे ही दुर्घटना झाली. परांडा डेपोची बस धाराशिवला येत होती. मात्र, चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस पलटी झाली. जखमींना स्थानिकांच्या मदतीने परांडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

Comments
Add Comment

Sangli : सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू

सांगली : जत तालुक्यात मोटेवाडी येथील मरगुबाई मंदिराची भिंत कोसळून सोमवारी दोन मुलांसह सहाजणांचा मृत्यू झाला.

Minister Adv. Akash Fundkar : राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ  प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश मुंबई: राज्यातील प्रत्येक कामगाराला त्याच्या हक्काच्या आरोग्य

Minister Chandrakant Patil : विद्यापीठांत आदिवासी संशोधनाला गती; आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी वाढणार

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या

Minister Chhagan Bhujbal : राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, पण काटकसर गरजेची! - मंत्री छगन भुजबळ

मुंबई : "महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल किंवा स्वयंपाकाच्या गॅसचा कोणताही तुटवडा नाही. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी

Chandrashekhar Bawankule : नवनीत राणांचा ‘बॉम्ब’ आणि बावनकुळेंची मिश्कील प्रतिक्रिया; म्हणाले, "नशिबात असेल तर...

अमरावती : अमरावतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नुकत्याच झालेल्या भाषणानंतर राज्याचे मंत्री आणि

Unauthorized bike taxi apps : अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश

कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राईम विभागाला पत्र मुंबई :