प्रवाशांनी भरलेली बस पलटी, चालकाची प्रकृती गंभीर

धाराशिव : ओडिशामध्ये तीन ट्रेनच्या झालेल्या भीषण अपघाताने देश हादरून गेला असतानाच महाराष्ट्रातही झालेल्या दोन अपघातांनी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.


मध्यरात्री एकच्या सुमारास दुसऱ्या टप्प्यातील समृद्धी महामार्गावर पहिला भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू तर अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर आज सकाळी धाराशिवमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाली. त्यात २६ प्रवासी जखमी झाले आहेत.


चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांना बार्शी येथे हलवण्यात आले आहे. तर इतर सर्वांवर परांडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


धाराशिव जिल्ह्यातल्या सोनगिरी चाकूला येथे ही दुर्घटना झाली. परांडा डेपोची बस धाराशिवला येत होती. मात्र, चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस पलटी झाली. जखमींना स्थानिकांच्या मदतीने परांडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

Comments
Add Comment

Vijayrao Deshmukh passes away: प्रख्यात शिवकथाकार विजयराव देशमुख यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

मुंबई: धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या

Nagpur News : नागपूर हादरलं! १२ वीच्या विद्यार्थ्याचा ११ वीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ काढून धमकी दिली अन् नको नको ते...

नागपूर : शिक्षण आणि परीक्षेचे वय असलेल्या तरुणांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याची धक्कादायक घटना

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधी वाढवून मिळावा; मंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०२५-२६ साठी ९०० कोटी रुपयांची तरतूद होती. सन २०२६ - २७ साठी ही ६९१.९०

Pune: भाजपाने पुण्यात उचललं कठोर पाऊल; ६९ बंडखोर सहा वर्षांसाठी निलंबित, 'या' मोठ्या नेत्यांचा समावेश

पुणे : नुकत्याच राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अनेक घडामोडी

Mumbai-Pune ExpressWay : चक्क भाजलेल्या हातांनी रोखला मृत्यू! पेरूच्या खुट्टीनं टळला मोठा अनर्थ; एक छोटी चूक अन् १० किमीचा परिसर झाला असता खाक

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर नुकत्याच झालेल्या महाभीषण वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

Weather Update: महाराष्ट्रातील वातावरणात बदल, कोकण ते विदर्भापर्यंत पुन्हा अलर्ट, ११ फेब्रुवारीला कसं असेल हवामान?

मुंबई: महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानात बदल दिसून येत आहे. हिवाळी थंड आता बऱ्याच प्रमाणात