पत्रकारांसमोर थुंकणार्‍या संजय राऊतांविरोधात दादरमध्ये शिवसेनेचं आंदोलन

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच अतर्क्य विधाने करत असतात. शुक्रवारी श्रीकांत शिंदे यांचं नाव ऐकताच राऊत पत्रकारांसमोर थुंकले. आपल्या आक्षेपार्ह कृतीबाबत सारवासारव करताना राऊत काहीही बरळत सुटले. त्यांनी स्वतःची तुलना थेट स्वातंत्र्यवीर सावरकरांशी केली. हे कमी की काय म्हणून विरोध दर्शवण्यासाठी थुंकण्याची क्रिया ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे त्यांनी म्हटले.


संजय राऊत म्हणाले की, "वीर सावरकरांना एकदा न्यायालयात आणण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांची माहिती देणारा एक बेईमान न्यायालयाच्या कोपर्‍यात उभा आहे. सावरकर त्याच्याकडे बघून थुंकले आणि याची इतिहासातही नोंद आहे. तेव्हा बेईमानांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती आहे, हिंदुत्व आहे. मी कोणावर थुंकलेलो नाही मात्र वीर सावरकरांनीदेखील देशाच्या गद्दारांवर न्यायालयात थुंकून संताप व्यक्त केला होता."



ही अत्यंत असंबद्ध विधाने केल्यानंतर स्वतःच्या कृतीबाबत स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले, "तुम्ही म्हणताय थुंकलो, थुंकलो, पण कुठे थुंकलो दाखवा. मी काल सांगितल्याप्रमाणे माझ्या दाताच्या प्रॉब्लेममुळे व्यक्त झालेली ती कृती आहे. त्यांना असं वाटतं की लोकं आमच्यावर थुंकतायत, हो हे खरंच आहे, पण ते मी कशाला व्यक्त करु?"


या दाताच्या प्रॉब्लेमनंतर संजय राऊतांनी अगदी विरूद्ध विधान केलं, "मी राजकीय नेत्यांची नावं ऐकून नव्हे तर बेईमान्यांची नावे ऐकून थुंकलो. ज्यांनी महाराष्ट्राशी, शिवसेनेशी व ठाकरे कुटुंबाशी बेईमानी केली त्यांची नावे ऐकल्यावर माझी जीभ चावली गेली आणि त्यातून थुंकण्याची प्रतिक्रिया आली." त्यामुळे राऊत नक्की दाताच्या प्रॉब्लेममुळे थुंकले की जीभ चावल्यामुळे थुंकले की बेईमान्यांची नावं ऐकून थुंकले याबाबत ते स्वतःच संभ्रमात आहेत की काय, असा प्रश्न पडतो.



राऊतांविरोधात शिवसेना आक्रमक


दरम्यान, संजय राऊतांच्या या आक्षेपार्ह कृतीबाबत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. दादर या ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या परिसरातच शिवसेनेने सदा सरवणकरांच्या नेतृत्वाखाली निदर्शने सुरु केली. कार्यकर्त्यांनी राऊतांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. रानडे रोडवर हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली