कणकवली (प्रतिनिधी) : अमेरिकेत जावून राहुल गांधी यांनी भारत देशाची आणि हिंदू धर्माची बदनामी केली. खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे, पाकिस्तानच्या घोषणा देणारे, भारताच्या राष्ट्रगीताचा अपमान ज्याच्या समक्ष होतो त्या राहुल गांधी यांचा ज्यांना अभिमान वाटतो, त्यांचे लांगुलचालन करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या जिभेचे संशोधन केले पाहिजे. राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकानमध्ये हिंदूंचा अपमान करणे हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. पाकिस्तानचे झेंडे फडकवत समर्थन केले जाते. अशा लोकांचे समर्थन करणारे १२ जूनला एकत्र येत असतील आणि त्यांना उबाठा सेनेचे उद्धव ठाकरे, संजय राऊत हे राष्ट्र भक्त म्हणत असतील तर त्यांच्या इतका गद्दार देशात दुसरा कोणी नसेल. अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे आणि राऊत यांच्यावर केली.
सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे देशाचा अभिमान आहेत. यांनी भारत देशाला सन्मान मिळवून दिला आहे. त्यांची तुलना राहुल गांधी यांच्याशी करताना राहुल गांधी यांनी देशासाठी काय केले, असा सवाल उपस्थित करत तेच राहुल गांधी अमेरिकेत जावून भारत देशाची आणि हिंदू धर्माची बदनामी करत आहे. हे संजय राऊत यांना भांडुपमध्ये बसून कळत नाही काय? असा घणाघात नितेश राणे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात गेले तेव्हा,”हिंदुस्तान जिंदाबाद..” “भारत माता की जय..!” अशा घोषणा दिल्या जात होत्या आणि राहुल गांधी यांच्या सभेत “खलिस्तान जिंदाबाद..” चे नारे देण्यात आले. हा या दोन देश प्रेमींमधला फरक असल्याचे नितेश राणे म्हणाले. पुढे नितेश राणे म्हणाले की, राहुल गांधी यांचे भाषण सुरू असताना समोर बसलेले लोक भारताचे राष्ट्रगान सुरू असताना उभे सुद्धा राहिले नाहीत. राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकानमध्ये हिंदूंना जागा नाही. त्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा आहेत, हिंदू देव देवतांच्या मंदीरांसमोर हिरवे झेंडे फडकवणे हेच या दुकानातून दिसते. हिंदूंचा अपमान करणे म्हणजे मोहब्बत की दुकान आहे. आपण देवाला, आई वडिलांना साष्टांग नमस्कार करतो. त्याचा अपमान राहुल गांधी अमेरिकेत जावून करत आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…
कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…
मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…
जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…