अमेरिकेत राहुल गांधीच्या दौऱ्यादरम्यान खलिस्तान्यांची मोदींनी मारण्याची धमकी

कॅलिफोर्निया: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अमेरिकतील दौऱ्यादरम्यान कॅलिफोर्निया येथे झालेल्या भाषणादरम्यान खलिस्तानी झेंडे फडकवत खलिस्तानची मागणी करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. या घटनेचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. अमेरिकास्थित खलिस्तानी संघटना 'एसएफजे'ने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. 'एसएफजे' प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने या घटनेचा व्हिडिओ जारी करत म्हटले की, १९८४ च्या शीख दंगलीत आम्ही काय केले, हे सर्वांनी पाहिलंय? राहुल गांधी अमेरिकेत कुठेही जातील. खलिस्तान समर्थक शीख तुमच्यासमोर उभे राहतील. २२ जूनला मोदींची बारी असेल.





राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय समुदायातील लोकांना संबोधित केले. आज येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीही राहुल संवाद साधणार आहेत. राहुल गांधी वॉशिंग्टन डीसीमध्ये संसद सदस्य आणि थिंक टँक यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करतील. त्यांच्या दौऱ्याची सांगता ४ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये जाहीर सभेने होणार आहे. हा कार्यक्रम न्यूयॉर्कमधील जाविट्स सेंटरमध्ये होणार आहे.

Comments
Add Comment

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात

परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील