सामनगाव रोड पॉलिटेक्नीक येथील अतिक्रमण जमीनदोस्त

अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई


नाशिक (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून नाशिक रोड विभागात अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. यावेळी तीन मजली आरसीसी अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले व नाशिक रोड सामनगाव रोड पॉलिटेक्नीक कॉलेज येथे सहा ते सात अनधिकृत घरांचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.


अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त तथा नाशिक रोड विभागीय अधिकारी मदन हरीश्चंद्र, नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील, पूर्वचे राजाराम जाधव, पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्यामार्फत ही अनधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.


कारवाईत नाशिक पश्चिम विभागाचे विकी जाधव, प्रवीण बागुल, नवीन नाशिक विभागाचे प्रदीप जाधव, सातपूर विभागाचे तानाजी निगळ व भगवान सुर्यवंशी आदी कर्मचारी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरीक्त पोलीस बंदोबस्त व मनपाचे सुरक्षा रक्षक कारवाईच्या वेळी हजर होते. कारवाई करतेवेळी अनधिकृत अतिक्रमण धारकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. कारवाईसाठी एक पोकलेन,२ जेसीबी, सहाही विभागांचे पथक तसेच नगर रचना विभागाचे उपअभियंता विशाल गरुड व सहा.अभियंता खुळे उपस्थित होते.


याबाबत अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी नागरिकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकामे, पत्र्याचे शेड, टपऱ्या अशा प्रकारचे अतिक्रमण काढून घेण्यात यावे. अन्यथा अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल आणि कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

शिवसेना महिला सेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई, दि. २५ जून

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील 'एसआयटी' वादाच्या भोवऱ्यात

- तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी दिलेल्या आदेशांवर विरोधकांनी घेतला आक्षेप मुंबई : पुण्यातील तरुण व्यावसायिक