पुण्यातील आयटी पार्कमधील एका इमारतीला आग

  88

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथील मॅरिगोल्ड आयटी पार्कमधील वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांची कार्यालये असलेल्या एका टॉवरमध्ये आज सकाळी आग लागल्याने एकच धावपळ उडाली. पुणे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला सकाळी ११:३० च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे शहर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. या आगीत ४ जण गंभीर जखमी झाले असून सुमारे १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत तर ४० जणांची सुटका करण्यात यश आले आहे.


आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक पाण्याचे टँकर, ब्रँटो शिडी आणि इतर उपकरणांसह घटनास्थळी दाखल झाले. पुणे अग्निशमन दलाने आयटी पार्कमधून ४० जणांची सुटका केली. या कारवाईदरम्यान अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले.


अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी सुरक्षा कर्मचार्‍यांनी आयटी पार्क इमारतीत बसवलेल्या अग्निशामक यंत्रांचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिल्या मजल्यावर लागलेली आग चौथ्या मजल्यापर्यंत वेगाने पसरली आणि मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जागा रिकामी करण्यास सुरुवात केली. मात्र त्यातील काही आतमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही.


दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या सुमारे २० जणांवर डॉक्टरांच्या पथकाने उपचार केले. गंभीर जखमी झालेल्या चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय काहींना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या काचेच्या भागाचा काही भाग तोडून अडकलेला धूर बाहेर काढला.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची