-
ऐकलंत का!: दीपक परब
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरे हा रसकांना हसवता-हसवता त्याने स्वत:लाही कैद करून घेतले आहे. दत्तूने लग्नाच्या बेडीत अडकण्याचा धाडसी निर्णय घेतला नि वेळ न घालवता लग्न करून मोकळाही झाला आहे. दत्तू मोरे २३ मे रोजी लग्नबंधनात अडकला असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दत्तूने ‘नवी सोबत नवी सुरुवात’ असे म्हणत त्याच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. मराठमोळा साज, डोक्याला बाशिंग बांधलेला लग्नाचा फोटो दत्तूने शेअर केला असून अनेक कलाकारांसह चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दत्तूने अनेकांना गुंगारा देत स्वाती घुंगाने हिच्याशी लग्नगाठ बांधली असून स्वत:ला ‘वन अँड ओन्ली’ म्हणणाऱ्या दत्तूला आता आयुष्यभराचा जोडीदार मिळाला आहे.
दत्तूची स्वाती डॉक्टर असल्याची माहिती आहे. त्याने मराठमोळ्या पद्धतीने लग्न केले असून त्याचे हटके प्री-वेडिंग फोटोशूटही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. दत्तू मोरे महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरांत पोहोचला. त्याचा अभिनय, त्याच्या भन्नाट टायमिंगचा, त्याच्या दाढीचा मोठा चाहता वर्ग आहे.