नाशिक : मागील महिन्यात जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. या सर्वात नाशिक बाजार समिती निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या आणि अवघ्या जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष वेधलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.
सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुकीत विरोधी चुंभळे गटाने ऐनवेळी माघार घेतल्याने सत्ताधारी गटाचे देविदास पिंगळे यांची सभापतीपदी तर उत्तमराव खांडबहाले यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
काही संचालकांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार व न्यायालयीन कारवाईच्या पार्श्वभूमीवर सभापती पदाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. तसेच संचालक फुटीच्या भितीतून देविदास पिंगळे व शिवाजी चुंभळे दोन्ही गटांनी आपल्या समर्थक संचालकांना गेल्या काही दिवसांपासून अज्ञातस्थळी रवाना केले होते. सभापती पदाच्या निवडणुकीसाठी हे संचालक शुक्रवारी परतीच्या प्रवासाला असल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सुमारे ४० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान विरोधी चुंभळे गटाने अर्ज दाखल न करता नूतन सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले. गेल्या ३० वर्षांत भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यामुळे पुन्हा सत्तापदी राहण्याची संधी मिळाली, अशी प्रतिक्रिया देविदास पिंगळेंनी व्यक्त केली. तर भ्रष्टाचारमुक्त कारभारासोबत शेतकर्यांचे हित जोपासणेदेखील गरजेचे आहे, शेतकरीहितासाठी विरोधात बसून काम करु, असे विरोधी गटाचे शिवाजी चुंभळे म्हणाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…