मविआची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत : नितेश राणे

कणकवली : भाजपच्या प्रत्येक गोष्टीवर टीकेची झोड उठवणा-या संजय राऊतांची 'मविआची गौतमी पाटील' असा उल्लेख करत भाजप आमदार नितेश राणेंनी राऊतांची चांगलीच जिरवली आहे. ते म्हणाले "गौतमी पाटील एक उत्तम कलाकार आहे. ती वेगवेगळ्या कार्यक्रमांत जाऊन नाचते, लोकांना नाचवते, लोकांमध्ये लोकप्रिय पण असेल. अशा गौतमी पाटीलला मी विनंती करेन की तुझं मेकअपचं थोडं सामान असेल तर संजय राऊतांकडे पाठव व त्याचं थोबाड जरा रंगव".


ते संजय राऊतांसारखे दलाल नाहीत


खासदार गजानन किर्तीकरांनी केलेल्या भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याच्या आरोपावर संजय राऊतांनी भाजपने आपला मूळ स्वभाव बदललेला नसल्याचं म्हटलं. यावर नितेश राणे म्हणाले, "गजानन कीर्तीकरांबद्दल काळजी करु नका. ते हाडाचे शिवसैनिक आहेत व ते बाळासाहेबांच्या विचारांसोबत कधीही तडजोड करणार नाहीत. ते संजय राऊतांसारखे दलाली करणार्‍यांपैकी नव्हेत".


दरम्यान ज्या गजानन कीर्तीकरांची तुम्हाला आता आठवण येतेय त्यांच्याच घरात वाद लावण्याचा प्रकार सुरु आहे, उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना त्यांच्याच वडिलांविरूद्ध लढवण्यासाठी तयारी केली आहे, असा आरोप नितेश राणेंनी केला.


संजय राऊत हा रंग बदलणारा सरडा


'भाजप हा पक्ष अजगर किंवा मगरीप्रमाणे आहे. तो सोबतींनाच गिळत सुटतो. हे शिंदे गटाला आता हळूहळू कळायला लागले आहे', असं संजय राऊत म्हणाले होते. त्यालाही नितेश राणेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे रंग बदलणा-या सरड्याप्रमाणे आहेत, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केली.


याबाबत नितेश राणे म्हणाले, "तेजस उद्धव ठाकरेंना प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या नवनवीन प्रजाती शोधण्याचा छंद आहे. त्यामुळे लांबलांबच्या ठिकाणी जाण्यापेक्षा एकदा सामना कार्यालयात जाऊन त्या सरड्याला पकडून त्याचा अभ्यास करावा, असं माझं म्हणणं आहे. सरड्यालाही लाज वाटेल एवढ्यांदा ते रंग बदलतात".

Comments
Add Comment

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण