धक्कादायक! सात वर्षाच्या मुलाकडून ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार...

कानपूर : एका सात वर्षांच्या मुलाने तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कानपूर शहराच्या चकेरी परिसरात घडली. धक्कादायक असे की, अल्पवयीन आरोपीने पीडितेवर कट रचून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.


आरोपीने पीडितेला सायकलवर बसवून फिरण्याचे आमिष दाखवले आणि तिला जवळच्या नाल्याजवळ नेले. तेथे नेऊन तिच्यावर त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.


सोबतच्या मुलाकडून आपल्यासोबत काहीतरी विचित्र प्रकार घडते आहे हे लक्षात येताच पीडिता घाबरुन गेली. तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता या मुलाने तिला धमकावले. परंतु पीडितेचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धाऊन आले. नागरिकांना पाहताच मुलगा मुलीला तिथेच सोडून पळून गेला.


दरम्यान, नागरिकांनी मुलीला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती दिली. पिडीतेला जखमी अवस्थेत रूग्णालयात नेण्यात आले आणि गृहनिर्माण नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले.


अल्पवयीन मुलाने तिला ब्लेडने जखमी केल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे.


चकेरीचे पोलीस अधिक्षक अमर नाथ यादव यांनी सांगितले की, डबल कॉलनी येथील एका सात वर्षीय मुलाने परिसरातीलच तीन वर्षांच्या मुलीला नाल्याजवळ नेले आणि तिच्यासोबत अमानूष वर्तन करण्याचा प्रयत्न केला. मुलीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पीडिता आणि आरोपी अल्पवयीन असल्याने सर्व बाजू विचारात घेऊन कायदेशीर कारवाई सुरु आहे.

Comments
Add Comment

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल