पुण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विकास टिंगरे (४९) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असून या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.


टिंगरे हे पुण्यातील विश्रांतवाडी परिसराचे काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथील पोरवाल रोडवर असलेल्या पतसंस्थेच्या कार्यालयात टिंगरे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी पतसंस्थेत आले होते. त्यांनी दुपारी जेवण केले नव्हते. त्यामुळे तेथील कर्मचार्‍यांनी ऑफिसमध्ये जाऊन पाहिल्यावर टिंगरे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना तत्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले केले. याबाबतचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक