कोलकाता : बॉलिवूडचे आताचे अनेक अभिनेते, अभिनेत्री समाजमाध्यमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. मात्र प्रत्यक्ष चाहत्यांना भेटायची वेळ आल्यावर ही मंडळी तितकासा उत्साह दाखवत नाहीत अशा गोष्टी कानांवर पडत राहतात. ‘अमुक’ अभिनेत्री फारच भाव खाते किंवा ‘तमुक’ अभिनेता चाहत्यांसोबत फोटो काढताना हसतच नाही यामुळे चाहत्यांकडून नाराजीचे सूर व्यक्त केले जातात. याबाबतीत अनेक वर्षे चाहत्यांच्या मनात घर करुन राहिलेला बॉलिवूडचा किंग शाहरुख मात्र वेगळा आहे. इतक्या वर्षांत त्याच्या चाहत्यांची संख्या कमी न होता वाढतच चालली आहे याचं कारण म्हणजे शाहरुखचं आपल्या चाहत्यांवर असलेलं प्रेम आणि त्यांच्याप्रती आदर! शाहरुखच्या एका कॅन्सरग्रस्त चाहतीला याची प्रचिती आली.
शिवानी चक्रवर्ती ही ६० वर्षीय महिला शाहरुख खानची खूप मोठी चाहती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती कॅन्सरशी झुंज देत आहे. कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजवर असताना मरणापूर्वी एकदा तरी शाहरुखला भेटायचे आहे अशी इच्छा तिने समाजमाध्यमाद्वारे व्यक्त केली. समाजमाध्यमावर या गोष्टीची बरीच चर्चा झाली.
शाहरुख खानला भेटण्याची कोलकाता येथील ६० वर्षीय कॅन्सरग्रस्त शिवानीची शेवटची इच्छा अखेर काल रात्री पूर्ण झाली. शाहरुखला शिवानीबाबत समजताच आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आपल्या चाहत्यासाठी थोडा वेळ बाजूला काढत त्याने शिवानीला रात्री व्हिडिओ कॉल केला व जवळपास ४० मिनीटे तो तिच्याशी बोलला.
इतकंच नाही तर मिडिया रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात येत आहे की किंग खान शिवानीला आर्थिक मदत करणार आहे. शिवानीने मुलीच्या लग्नाचे निमंत्रणही त्याला दिले होते. त्यावर शाहरुखने तिला भेटण्याचे व कोलकाताला तिच्या घरी येऊन मासे खाण्याचे आश्वासन दिले आहे. शाहरुख खान हा त्याच्या चाहत्यांसाठी काहीही करु शकतो हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…