Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीमुंबई पोलीस अलर्ट मोडवर! २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी

मुंबई पोलीस अलर्ट मोडवर! २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी

मुंबई: मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याच्या धमकीचा फोन आला असून धमकी देणाऱ्याने त्यात २६/११ चा उल्लेख केला आहे. संबंधित व्यक्तीने फोन अचानक कट केला तसेच त्यात २६/११ चा उल्लेख केल्याने पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलिसांना धमकीचे फोन सुरू आहेत. त्यातच रविवारी रात्री एका अनोखळी क्रमांकावरून फोन आला. त्यात संबंधिताने मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा उल्लेख केला आणि अचानक फोन कट केला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण राजस्थानमधून बोलत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या व्यक्तीने यापूर्वीही फोन केल्याचे समोर आले आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकीही काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना मिळाली होती. याबाबत एका संशयिताला पोलिसांनी चेंबूर परिसरातून अटक केली होती. इरफान अहमद शेख (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी असल्याचे सांगितले होते.

तसेच मुंबई पोलिसांना फेब्रुवारी महिन्यातही एक फोन आला होता. त्यात आता प्रमाणेच २६/११ चा उल्लेख करत मुंबईतल्या कुर्ला भागात स्फोट करू, असा इशारा देण्यात आला होता. पण तपासाअंती पोलिसांना याबाबत काहीही सापडलेले नव्हते.

या अशा धमक्यांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांसह मुंबई विमानतळ, मंत्रालय, बीएसई या महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -