काँग्रेसचा 'हा' नेता भाजपच्या वाटेवर; फडणवीसांनी घेतली भेट

  93

सावनेर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत. या दरम्यान फडणवीस यांनी काँग्रेसमधून तात्पुरतं निलंबित केलेल्या एका नेत्याच्या घरी भेट दिली. त्यामुळे या नेत्याला आता भाजपमधून उमेदवारी मिळणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. सोबतच या नेत्याच्या हालचालींमुळे तो भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.


'आशिष देशमुख' असं या नेत्याचं नाव असून त्यांना काँग्रेसमधून तात्पुरतं निलंबित केलं आहे. तसंच, सावनेरमध्ये सध्या भाजपचा आमदार नाही. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नागपूरजवळच्या सावनेर मतदारसंघातून आशिष देशमुख यांना भाजपचं तिकीट मिळणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.


दरम्यान सावनेरमध्ये शुक्रवारी १९ मे ला कार्यकर्त्यांसमोर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं. उमेदवार ठरल्यावर वाद नको, असं फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे देशमुखांना सावनेरमधून भाजपकडून उमेदवारी मिळणार का हे पाहावं लागेल.


सोबतच देशमुख भाजपच्या वाटेवर आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण आशिष यांनी आपले वडील रणजीत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त २९ मे ला सावनेरमध्ये अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. रणजीत हेच आधी सावनेरचे आमदार होते. सावनेरचे सद्यकालीन आमदार सुनील केदार यांनी १९९६ मध्ये त्यांचा पराभव केला. त्यामुळे आता आशिष देशमुख पुन्हा या जागेवर डोळा ठेवून असल्याची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख हे सुनील केदार यांच्याविरोधात उभे राहणार का, ते पाहावं लागेल.


Comments
Add Comment

बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक, विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते भिडले

बीड : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणी पुणे : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना मंडई, शनिपार, तुळशीबाग

गणेशोत्सवासाठी प्लास्टिक फुलांची दुकाने सजली...!

फुलशेती कोमेजली, शासनाने प्लास्टिक फूल, हार विक्रीवर बंदी घालावी श्रीरामपूर : एकीकडे प्लास्टिक बंदीचा जागर सुरू

ST Employees Salary: बाप्पा पावले! एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळणार

मुंबई: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा

अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईसाठी निघणार, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर

Atharv Sudame controversy: गणेशोत्सवापूर्वी व्हायरल झालेल्या 'त्या' रीलमुळे पुण्याचा कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे अडचणीत! मागितली माफी

पुणे: लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अथर्व सुदामेच्या पुणेरी रील्सचे अनेक चाहते आहेत. सुदामेने त्याच्या