ठाकरे सेनेला विधान सभेसाठी ९६ जागा देण्याची सिल्वर ओक मविआची चर्चा

Share
  • भाजपा आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट
  • लोकसभेच्या १८ जागांवर सुद्धा ठाकरे ठाम राहू शकत नाही
  • ..त्या २००० च्या नोटांचे काय करावे याची उद्धवजींना चिंता

(कणकवली, प्रतिनिधी): माहविकास आघाडीच्या विधान सभेची चर्चा झाली. आघाडीतील तिन्ही पक्षांनी समान प्रत्येकी ९६ जागा लढवायच्या असे ठरविण्यात आले. तशी चर्चा महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्वर ओक येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. पूर्वी शिवसेना १२२ जागांवर लढवली तेव्हा ५४ आले. आता ९६ लढवून २० तरी निवडून येणार आहेत काय ? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

सिल्वर ओक मध्ये उद्धवजींना साधी खुर्ची सुद्धा दिली नाही. ते महविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना जागा वाटपात न्याय देतील का ? असा सवाल ही यावेळी आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. उद्धवजींनी ९६ जागा मान्य नाहीत असे सांगितले तेव्हा पुढच्या बैठकीत निर्णय घेण्याचे ठरले. अशीही माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत शिल्लक सेनेने १८ जागावर लढणार असे सांगितले आहे. हा आवाज दाखवला तो किती काळ राहतो. शकुनी मामा खासदार संजय राऊत यांनी आधी आपल्या मालकाचे राजकीय वजन तेव्हढे आहे काय हे पाहावे. सिल्वर ओक वर शरद पवार यांच्या उपस्थितीत जागावाटप ठरले तेव्हा ठाकरे – राऊत यांनी मान्य म्हणून सांगितले आणि आता मान्य नाही म्हणत आहेत. त्या बैठकीत राऊत ना जीभ आवरा, वातावरण बिघडवू नका असे सांगितले. तरीही शकुनी मामाच्या रोलमधून राऊत बाहेर येत नाही. काड्या घालण्याचे काम सुरू आहे. २०१४ ते १९ मध्ये जे शिवसेनेचे मंत्री झाले. महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये ठाकरे यांच्या कोट्यातून जी मंत्री पदे दिली त्यांनी किती खोके दिले ते आधी सांगा. मातोश्रीवर किंवा कर्जत च्या फार्म हाऊस वर कोणी कोणी किती खोके पोचवले हे जाहीर करण्याची वेळ आणू नका. आता २००० ची नोट बंद झाली तेव्हा कर्जतच्या फार्म हाऊस मधील जमिनीमध्ये पुरून ठेवलेले पैसे त्यातील दोन हजाराच्या नोटांचे करायचे काय असा प्रश्न ठाकरे कुटुंबियांसमोर उभा राहिलेला आहे. त्यामुळे कर्जतच्या फार्म हाऊस वर खोदकाम करण्याची वेळ आणू नका असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी दिला. तुमच्या मालकाचे नंदकिशोर चतुर्वेदीकडे असलेले पैसे कधी आणणार ते आधी सांग मग काळा पैसा या विषयावर बोलू.

पाटणकर लंडन मध्ये मध्यंतरी का लपून राहिला होता ते सांगण्याची वेळ आणू नका राज्यात दहशतवाद थांबला. अमली पदार्थविरोधी कारवाई झाली. अमली पदार्थ विक्री थांबली. हे मोदी सरकार आल्यामुळे शक्य झाले आहे. काश्मीर स्वतंत्र झाले, राम मंदिर उभे राहिले मात्र दंगल आणि आतंकवाद घडवण्याची हिंमत झालेली नाही हा मोदी सरकारचा परिणाम आहे. निष्ठावंत शिवसैनिक खरं बोलला. त्याला हाकलून दिले.

सोफा आणि एसी साठी पैसे घेतले. त्यांना पाठीशी घातले. यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि असंख्य शिवसेनेतील नेते जे उद्धव ठाकरेंना सोडून गेले ते याच भ्रष्टाचारावर बोलत होते निष्ठावंत यांची हकालपट्टी करून भ्रष्टाचारांना खुर्ची देण्याची रीत आता मातोश्रीवर निर्माण झालेले आहे. अशा शब्दांत सुषमा अंधारे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले म्हणून बीड जिल्हाध्यक्षाची केलेली हकालपट्टी याविषयी आमदार नितेश राणे यांनी समाचार घेतला. कर्नाटक मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला ठाकरे अनुपस्थित राहणार या विषयी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले ,२००० रुपयांच्या नोटा बंद झाल्याची चिंता लागली आहे. त्या चिंतेत उद्धवजी आहेत. त्यामुळे ते काही दिवस तरी मातोश्रीच्या बाहेर येणार नाही. असा टोला हाणला.

आम्ही सर्वच मुसलमानांच्या विरोधात नाही..

आम्ही सर्वच मुसलमानांच्या विरोधात नाही. मात्र देश विरोधात काम करणारे, धर्मांध मुसलमान आहेत त्यांच्या विरोधात आहोत. देशाभिमानी अनेक चांगले मुसलमान या समाजात आहेत. अशा लोकांसमवेत आमचे स्नेहाचे संबंध आहेत. असे यावेळी त्यांनी सांगितले.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

32 minutes ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

1 hour ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

3 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

4 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

4 hours ago