मध्य व ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

  243

मुंबई : विविध तांत्रिक कारणांसाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेतर्फे हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर असेल. ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.



पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
ब्लॉकदरम्यान पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलकरीता जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी भागात विशेष लोकल धावतील.



ठाणे ते वाशी व नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाइन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.

Comments
Add Comment

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबई, पुणे, दक्षिण कोकणसह राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा ॲलर्ट

मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी पावसाची उपस्थिती दिलासादायक होती. वीकेंडला एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दिलासादायक! मुंबईत कोविड शून्य रुग्ण नोंद

कोविड सदृश्य अथवा तत्सम लक्षणे आढळल्यास कृपया योग्य ती काळजी घ्यावी : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे