हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक

वाशिम : हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने वाशिम बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले. शेतकर्‍यांनी बाजार समितीतच घोषणाबाजी सुरु केली आणि या घोषणाबाजीदरम्यान शेतकर्‍यांनी हळद खरेदी बंद पाडली.


वाशिम बाजार समितीत आठवड्यातून एकच दिवस शनिवारी हळद खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो. मात्र या व्यवहारात हळदीचे भाव कमी करुन व्यापारी हळद खरेदी करत असल्याचा आरोप करत शेतकरी रस्त्यावर उतरले होते. अकोला - हैदराबाद रस्त्यावर शेतकर्‍यांनी ठिय्या मांडला.


वास्तविक हळदीला ७,५०० ते ८,५०० रुपये इतका भाव मिळतो. मात्र खरेदीदार केवळ ४,५०० ते ६,५०० चा भाव लावत होते. त्यामुळे हळदीचे भाव कमी करुन व्यापारी हळद खरेदी करत आहेत, अशी शेतकर्‍यांची धारणा झाली. हळदीला योग्य भाव द्या अन्यथा हळद खरेदी होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि