Saturday, July 13, 2024
Homeमहत्वाची बातमीजे दंगली घडवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना अद्दल घडवणार!

जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना अद्दल घडवणार!

राज्यात दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात असल्याचा गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई : राज्यात दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याठिकाणी आता शांतता आहे. पोलीस अलर्ट मोडवर होते, त्यामुळे कुठेही अनटोल्ड इंसिडन्स होऊ दिला नाही. जेव्हा लक्षात आले की अशाप्रकारे काही लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करताहेत, तेव्हा सगळीकडची पोलीस कुमक त्याठिकाणी पोहोचली आणि आता पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना अद्दल घडवणार, असा इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

राज्यात दंगल आणि हिंसाचाराचं वातावरण

महाराष्ट्रात सातत्याने दंगली का उसळताहेत, असा प्रश्न फडणवीसांना विचारला असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हे १०० टक्के जाणूनबुजून होतंय. कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतंय. पण ते सफल होणार नाही. अशाप्रकारे जे करताहेत त्यांना आम्ही सोडणार नाही”, असा सज्जड दमच फडणवीसांनी दिला आहे. “काही संस्था, काही लोक मागून याला आग लावण्याचा, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करताहेत आणि हे सगळं बाहेर आणेन”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नगर जिल्ह्यातील शेवगाव परिसरात काल छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचाराचा प्रकार घडला. दोन गटांमध्ये वादावादी होऊन दगडफेक करण्यात आली.

त्याआधी १३ मे ला सकाळी ९:३० ते ९:४५ च्या सुमारास नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात काही इतर धर्मीयांनी बळजबरी घुसण्याचा प्रयत्न केला.

अकोला शहरातही हरिहरपेठेत शनिवारी १३ मे ला रात्री दोन गटांत मोठा राडा झाला. इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे आधी भांडण आणि मग दंगल उसळली असल्याचं सांगितलं जात आहे. या व्यक्तिविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जाळपोळ, मारहाण, दगडफेक यामुळे हरिहरपेठ पेटलं होतं. या घटनेनंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -