पार्नेल, ब्रेसवेलपुढे राजस्थान शरण

बंगळूरुचा ११२ धावांनी मोठा विजय


जयपूर (वृत्तसंस्था) : वायने पार्नेल, मायकल ब्रेसवेल आणि कर्ण शर्मा यांनी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडत 'करो या मरो' लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला ११२ धावांनी मोठा विजय मिळवून दिला. आरसीबीने टिच्चून गोलंदाजी करत राजस्थानचा संघ अवघ्या ५९ धावांवर सर्वबाद केला. फाफ डु प्लेसीस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावत बंगळूरुला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. विजयासह आरसीबीने गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली.



आरसीबीच्या गोलंदाजीपुढे राजस्थानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. राजस्थानच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. १७२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या दोन्ही सलामीवीरांना भोपळाही फोडता आला नाही. चांगलाच फॉर्मात असलेला यशस्वी जयस्वाल आणि जोश बटलर ही जोडी आपल्या धावांचे खातेही न उघडता तंबूत परतली. त्यानंतर संजू सॅमसन केवळ ४ धावा करून पार्नेलचा शिकार झाला. अवघ्या ७ धावांवर ३ महत्त्वाचे मोहरे माघारी परतल्याने राजस्थानचा संघ अडचणीत सापडला. तेथून बाहेर पडणे शेवटपर्यंत राजस्थानला जमले नाही. शिमरॉन हेटमायरने ३५ धावा जोडत राजस्थानच्या पराभवातील अंतर काहीसे कमी केले. जो रुटने १० धावांची भर घातली. अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही जमवता आली नाही. राजस्थानचा डाव १०.३ षटकांत ५९ धावांवर आटोपला. वायने पार्नेलने आरसीबीच्या फलंदाजांना नियंत्रणात ठेवले. त्याने ३ षटकांत केवळ १० धावा देत तीन प्रमुख फलंदाजांना बाद केले. मायकल ब्रेसवेलने ३ षटके फेकत १६ धावा देत २ फलंदाजांना माघारी धाडले. कर्ण शर्मा महागडा ठरला. परंतु त्याने २ विकेट मिळवल्या. सिराज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.



तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या फाफ डु प्लेसीस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावत बंगळूरुला निर्धारित २० षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात १७१ धावा उभारून दिल्या. अनुज रावतने तळात झटपट खेळी खेळली. त्याने ११ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद २९ धावा फटकवल्या. त्यामुळे बंगळूरुला आपल्या धावांचा वेग वाढवता आला. राजस्थानच्या अॅडम झम्पाने धावा रोखत २ बळी मिळवले. केएम असिफनेही २ फलंदाजांना माघारी धाडले; परंतु त्याला धावा रोखणे जमले नाही.

Comments
Add Comment

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची