पार्नेल, ब्रेसवेलपुढे राजस्थान शरण

Share

बंगळूरुचा ११२ धावांनी मोठा विजय

जयपूर (वृत्तसंस्था) : वायने पार्नेल, मायकल ब्रेसवेल आणि कर्ण शर्मा यांनी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडत ‘करो या मरो’ लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला ११२ धावांनी मोठा विजय मिळवून दिला. आरसीबीने टिच्चून गोलंदाजी करत राजस्थानचा संघ अवघ्या ५९ धावांवर सर्वबाद केला. फाफ डु प्लेसीस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावत बंगळूरुला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. विजयासह आरसीबीने गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली.

आरसीबीच्या गोलंदाजीपुढे राजस्थानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. राजस्थानच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. १७२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या दोन्ही सलामीवीरांना भोपळाही फोडता आला नाही. चांगलाच फॉर्मात असलेला यशस्वी जयस्वाल आणि जोश बटलर ही जोडी आपल्या धावांचे खातेही न उघडता तंबूत परतली. त्यानंतर संजू सॅमसन केवळ ४ धावा करून पार्नेलचा शिकार झाला. अवघ्या ७ धावांवर ३ महत्त्वाचे मोहरे माघारी परतल्याने राजस्थानचा संघ अडचणीत सापडला. तेथून बाहेर पडणे शेवटपर्यंत राजस्थानला जमले नाही. शिमरॉन हेटमायरने ३५ धावा जोडत राजस्थानच्या पराभवातील अंतर काहीसे कमी केले. जो रुटने १० धावांची भर घातली. अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही जमवता आली नाही. राजस्थानचा डाव १०.३ षटकांत ५९ धावांवर आटोपला. वायने पार्नेलने आरसीबीच्या फलंदाजांना नियंत्रणात ठेवले. त्याने ३ षटकांत केवळ १० धावा देत तीन प्रमुख फलंदाजांना बाद केले. मायकल ब्रेसवेलने ३ षटके फेकत १६ धावा देत २ फलंदाजांना माघारी धाडले. कर्ण शर्मा महागडा ठरला. परंतु त्याने २ विकेट मिळवल्या. सिराज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या फाफ डु प्लेसीस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावत बंगळूरुला निर्धारित २० षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात १७१ धावा उभारून दिल्या. अनुज रावतने तळात झटपट खेळी खेळली. त्याने ११ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद २९ धावा फटकवल्या. त्यामुळे बंगळूरुला आपल्या धावांचा वेग वाढवता आला. राजस्थानच्या अॅडम झम्पाने धावा रोखत २ बळी मिळवले. केएम असिफनेही २ फलंदाजांना माघारी धाडले; परंतु त्याला धावा रोखणे जमले नाही.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

5 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

5 hours ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

5 hours ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

5 hours ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

5 hours ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

5 hours ago