मुंबई : कर्नाटक निवडणुकीनंतर लवकरच कमबॅक करु असं म्हटलेल्या भाजपने आगामी लोकसभा, विधानसभा व पालिका निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी भाजप नेहमीच प्रयत्नशील असतं. यंदा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने युवा संवाद मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
१८ मे ला सकाळी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तरुण मतं निर्णायक असतात त्यामुळे जास्तीत जास्त तरुण मते मिळवण्याकडे भाजपचा कल आहे. या युवा संवाद मेळाव्यातून युवकांना करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. १७ मे ला ते मुंबईत येतील आणि १८ मे ला सकाळी हा मेळावा पार पडेल. यामध्ये ते युवकांशी थेट संवाद साधणार असून युवकांना सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे ते जाणून घेणार आहेत.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…