पिंपरी-चिंचवड : पुण्यात दोन दिवसांपूर्वी तळेगाव दाभाडे येथील उद्योजक आणि जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचा मास्टरमाइंड गौरव खळदे हा सिव्हिल इंजिनीअर आहे. आपल्या वडिलांच्या अपमानाबाबत बदल्याची भावना मनात ठेवून गौरवने हा खून केला असल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी किशोर आवारे यांनी गौरव खळदेचे वडील भानुदास खळदेंच्या सर्वांसमक्ष कानशिलात लगावली होती. या घटनेवरुन गौरवचे मित्र सतत त्याला चिडवायचे आणि त्याचा गौरवला राग यायचा. या रागातूनच आवारेंना जीवानिशी मारायचा कट त्याने रचला.
या खुनामध्ये शाम निगडकर या गौरवच्या मित्राने त्याला सर्वाधिक मदत केली. गौरव शामला बर्याचदा आर्थिक मदत करायचा त्यामुळे गौरवने मदतीसाठी विचारल्यावर शाम नकार देऊ शकला नाही, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली.
पिंपरी-चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे आणि भानुदास खळदे यांचा डिसेंबर महिन्यात नगरपालिकेमध्ये एका विषयावरुन वाद झाला होता. या वादात किशोर आवारे यांनी जनसेवा पक्षाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक भानुदास खळदे यांच्यावर हात उगारला. याबाबत किशोर आवारेंविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि प्रतिबंधात्मक कारवाईदेखील केली गेली होती. परंतु आपल्या वडिलांना सर्वांदेखत कानाखाली मारली आणि बेईज्जती केली याचा राग गौरवच्या मनात राहिला. त्याने जानेवारीपासून हत्येचा कट रचला आणि मारेकर्यांना आपल्या साथीने घेत किशोर आवारेंचा खून केला, असं प्राथमिक तपासातून निष्पन्न झालेलं आहे.
आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केलेली आहे. याबाबत पुढील कारवाई पोलिस करत आहेत.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…