भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या जगदीश शेट्टार यांचा दणदणीत पराभव

Share

भाजपचे महेश तेंगिनकाई तब्बल ३० हजार मतांनी विजयी

हुबळी-दारवाड : भाजपकडून प्रवेश न मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये गेलेले जगदीश शेट्टार यांचा दणदणीत पराभव झाला आहे. सहा वेळा आमदार राहिलेले शेट्टार पक्षबदलीनंतर भाजपविरोधी निवडणुकीत उभे राहिल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु शेट्टार यांचा हुबळी-धारवाड मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपच्या महेश तेंगिनकाई यांच्याकडून जवळपास ३० हजार मतांनी पराभव झाला.

जगदीश शेट्टार यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाला दक्षिणेकडील राज्यात जबरदस्त विजय मिळेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते. भाजपने मात्र शेट्टार विजय मिळवण्यात अपयशी ठरतील असे म्हटले होते.

“आम्ही शेट्टार यांना राज्यसभा सदस्यत्व देण्याचे वचन दिले होते. आम्ही त्यांना केंद्रात मंत्री बनवू असे अमित शहा स्वतः शेट्टार यांच्याशी बोलले होते. आम्ही जवळजवळ प्रत्येक वेळी त्यांना मनापासून पाठिंबा दिला. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी पक्ष सोडण्याची चूक केली”, असे येडियुरप्पा माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Recent Posts

Prakash Mahajan : ‘या’ महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका!

मनसे नेते प्रकाश महाजन यांची मागणी मुंबई : राज्य सरकारने (State Government) 'माझी लाडकी बहीण'…

54 mins ago

Ambadas Danve : काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंची वरिष्ठांकडून कानउघडणी!

अखेर विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून व्यक्त केली दिलगीरी; सभागृहातही दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी मुंबई…

1 hour ago

Eknath Shinde : दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री…

2 hours ago

Ashadi Wari : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोलमाफी

मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…

2 hours ago