सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता १२वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. बारावीच्या निकालात एकूण ८७.३३% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

१५ फेब्रुवारी ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी सुमारे १६.९ लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ७.४ लाख महिला विद्यार्थीनी तर ९.५१ लाख पुरुष विद्यार्थी आणि ५ विद्यार्थी 'इतर' श्रेणीत नोंदणीकृत आहेत. ३६ दिवसांत एकूण ११५ विषयांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यांचे निकाल आता सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

विद्यार्थी results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in. या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहू शकतात. या संकेतस्थळांव्यतिरिक्त विद्यार्थी बोर्ड परीक्षेचे निकाल तपासण्यासाठी DigiLocker, UMANG प्लॅटफॉर्म देखील वापरू शकतात. २०२३ च्या CBSE इयत्ता १०च्या निकालाची तारीख आणि वेळ अजून जाहीर झालेले नाहीत.
Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था