जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील उन्हाचा पारा २ ते ३ अंशांची घसरून ४० अंशांवर आला होता. मात्र आज गुरुवारी राज्यातील सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर भुसावळात ४४.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सोमवार (ता. ८) पासून तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी (ता. ९) तापमानाने चाळिशी पार करीत ४३.३ अंशांपर्यंत मजल मारली. बुधवारी (ता. १०) ४४.६ अंश तर आज गुरुवारी (दि. ११) ४४.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.
जळगावात आज गुरुवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.८ तापमानाची नोंद शहरातील केंद्रीय जल आयोग कार्यालयात झाली. गेल्या तीन दिवसांतच शहराचे कमाल तापमान तब्बल ४.३ अंशांनी वाढल्याचे या नोंदीतून समोर आले. पुढचे काही दिवस उष्णतेची लाट अशीच राहणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…