कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपूनच राहिलं पाहिजे : राज ठाकरे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया


मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर चारही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना या निकालाबाबत आपली भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संभ्रमात टाकणारा आहे, असं ते यावेळी म्हणाले.


"कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपूनच राहिलं पाहिजे. आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाहीत म्हणून आज हे सगळं उभं राहिलं. आपण कुठच्या पदावर बसलेलो आहोत हे प्रत्येकाला समजलं पाहिजे", असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना जपून राहण्याचा सल्ला दिला.


सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार विधीमंडळातल्या गटाला पक्ष म्हणून मान्यता नसून बाहेरच्या गटाला आहे. मग आता निवडणूक आयोगाकडून नाव आणि चिन्ह ज्या गटाकडे दिलं गेलंय त्याचं काय होणार? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब