
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन काही मते मांडली. संजय राऊतांना सगळ्यामध्ये तोंड खुपसायची सवय आहे,असा दावा त्यांनी यावेळी केला. तसंच देशात लोकशाहीच्या अस्तित्वाविषयी प्रश्न उपस्थित करणार्या संजय राऊतांना त्यांच्याच पक्षप्रमुखांच्या गैरवर्तुणुकीची उदाहरणे देऊन चपराक दिली.
"संजय राऊत सातत्याने कायद्याचा गाढा अभ्यास असणार्या राहुल नार्वेकरांवर टीका करतात, जणू काही हे स्वतःच फार मोठे घटनातज्ज्ञ किंवा मुन्नाभाई एल.एल.बी आहेत. पण त्यांनी एक लक्षात घ्यावं की ज्या राहुल नार्वेकरांवर तुम्ही टीका करतायत त्यांच्याकडेच तुमच्या मालकाचा मुलगा म्हणजे आदित्य ठाकरे कायदा शिकायला जात होते. म्हणजेच आदित्य ठाकरेलाहु कायद्याचं काही कळत नाही", असं नितेश राणे म्हणाले.
आजच्या निकालावरुन देशात लोकशाही आहे की नाही हे कळेल, असं टेपरेकाॅर्डर संजय राऊत यांनी लावलं आहे. म्हणजे यांच्याविरुद्ध लागला तस लगेच लोकशाही खतरे में है, असं हे म्हणतील. पण ज्या देशात तुम्ही लोकशाहीचा सवाल उपस्थित करताय तिथे लोकशाही नसती तर आदित्य ठाकरे कोविडच्या वेळी जग घरात बसलेलं तेव्हा हाॅटेलमध्ये दारु पित बसले नसते. कर्नाटकात प्रचार करणार्या माननीय पंतप्रधान मोदींनी देश सांभाळला पाहिजे, हे राऊतांनी उद्धव ठाकरेंना ते मुख्यमंत्री असताना समजवायला पाहिजे होतं. तसंच गोवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य शिवसेनेच्या प्रचारासाठी गेले असताना डब्ल्यू हाॅटेलच्या रुममध्ये काय करत होते?" असं म्हणत नितेश राणेंनी राऊतांची चांगलीच जिरवली आहे.
सामनाच्या अग्रलेखामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलण्याची तुमची लायकी नसल्याचं नितेश राणे संजय राऊतांना म्हणाले. 'कोर्टाचा आजचा निकाल हा संविधानानुसारच होईल, उगाच संजय राऊतांनी दुसर्यांना धडे देऊ नये' असा सल्लाही नितेश राणे यांनी दिला.