कोलकाता पंजाबवर भारी

कोलकाता (वृत्तसंस्था) : वरुण चक्रवर्तीची दमदार गोलंदाजी आणि नितीश राणा, आंद्रे रसेल यांची फटकेबाजी त्याला मिळालेली रिंकू सिंहची निर्णायक खेळी पंजाबविरुद्धच्या सामन्यात कोलकातासाठी यशस्वी ठरली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रिंकू सिंहने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत कोलकाताला विजय मिळवून दिला.



पंजाब किंग्जने दिलेले १८० धावांचे लक्ष्य गाठताना कोलकाता नाईट रायडर्सला बरी सुरुवात मिळाली. सांघिक फलंदाजी करत कोलकाताने विजय सोपा केला. त्यात कर्णधार नितीश राणाने ५१ धावांचे योगदान दिले. आंद्रे रसेलची बॅट चांगलीच तळपली. त्याला रिंकू सिंहने छान साथ दिली. त्यामुळे कोलकाताने फटकेबाजी करत सामना आपल्या बाजूने वळवला होता. परंतु शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत कोलकाताला झुंजवले. कोलकाताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची आवश्यकता होती. थरारक अशा या सामन्यात रिंकू सिंहने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत कोलकाताला विजय मिळवून दिला. रसेलने ४२ धावा फटकवल्या. रिंकू सिंहने १० चेंडूंत नाबाद २१ धावा फटकावत कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. रिंकूची ही खेळी निर्णायक अशी होती. पंजाबचा अर्शदीप सिंग महागडा गोलंदाज ठरला असला तरी त्याने शेवटचे निर्णायक असे षटक अप्रतिम टाकले. राहुल चहरने पंजाबकडून चांगली गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २३ धावा देत २ विकेट मिळवल्या.



नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. प्रभसिमरन अवघ्या १२ धावा काढून तंबूत परतला. प्रभिसमरन याच्यानंतर भानुका राजपक्षे यानेही विकेट फेकली. एका बाजूला विकेट पडत असताना शिखर धवनने संयमी फलंदाजी केली. धवनने पंजाबच्या डावाला आकार दिला. त्याने ४७ चेंडूंत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत धवनने नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. नितीश राणाने धवनची खेळी संपुष्टात आणली. लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांना चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात हे दोन्ही फलंदाज अडकले. कर्णधार शिखर धवनच्या अर्धशतकाच्या बळावर पंजाबने निर्धारित २० षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात १७९ धावांपर्यंत मजल मारली. शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रार यांनी अखेरच्या षटकांत दमदार फलंदाजी केली. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. आंद्रे रसेलने एक षटक टाकले पण तो महागडा ठरला. त्याला एका षटाकात १९ धावा चोपल्या. पंजाबच्या फलंदाजांनी रसेलच्या एका षटकात ४ चौकार लगावले.

Comments
Add Comment

Shubman Gill Century : कर्णधार शुभमन गिल नावाचं 'वादळ' थांबायचं नाव घेत नाही! वेस्ट इंडिजला धुवून काढत रोहित शर्माचा 'हा' मोठा विक्रम मोडीत काढला.

यशस्वी जैस्वाल पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलचे शानदार कसोटी शतक नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies 2nd Test Day 2)

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे नाते चर्चेत: एकत्र फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हार्दिक आणि

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज