शरद पवार निपाणीला रवाना

निपाणी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज निपाणीकडे रवाना झाले आहेत. हेलिकाॅप्टरने ते कागलमध्ये दाखल झाले आहेत. काही वेळातच ते निपाणीला पोहोचतील.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहायचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार आज निपाणीला सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ९ उमेदवार उभे केले आहेत. त्यांपैकी एक निपाणी मतदारसंघ आहे. या निपाणी मतदारसंघाचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा आज दुपारी ३ वाजता होणार आहे. त्यानंतर ते त्यांच्या पुढच्या दौर्‍यासाठी रवाना होतील.

काल म्हणजेच ७ मे ला देवेंद्र फडणवीस यांनी निपाणी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारासाठी याच ठिकाणी सभा घेतली होती. निपाणीला ज्या ठिकाणी फडणवीसांची सभा झाली तिथेच शरद पवार आज सभा घेणार आहेत. या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाऊस आणि शरद पवारांची सभा आता पुन्हा जुळून येईल की काय अशी चर्चा केली जात आहे.

आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने शरद पवार सभेतून राष्ट्रवादीला मतं देण्यासाठी नक्की काय आवाहन करणार आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले