मणिपूरमधून बाहेर पडण्यासाठी कोलकाताचे नागरिक मोजत आहेत तब्बल २५ हजार रुपये

इंफाळ : गेले काही दिवस मणिपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचारामुळे अनेक लोक तिथे अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर तेथून घरी परतणाऱ्यांची संख्या अचानक अनेक पटींनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून, राज्यात राहणारे कोलकाताचे लोक कोणत्याही मार्गाने आपल्या घरी परतण्याची घाई करत आहेत. यामुळे इंफाळ ते कोलकाता खाजगी विमानांचे भाडे २५,००० रुपयापर्यंत पोहोचले आहे, जे सामान्य किमतीपेक्षा ८ पट जास्त आहे. साधारणपणे, दोन शहरांमधील विमान प्रवासाचे भाडे जवळपास २५०० ते ३००० रुपये आहे.


इथून तात्काळ बाहेर पडण्यासाठी हजारो लोक आपल्या विमानाची वाट पाहत होते. बरेच लोक विमानाची वाट पाहत जमिनीवर बसलेले किंवा झोपलेले आहेत. शहरातून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या पाहता, विमानतळ सार्वजनिक बस स्टॅंड किंवा रेल्वे स्टेशनसारखे दिसते होते.


इंफाळ - कोलकातादरम्यान उड्डाण करणार्‍या विमान कंपन्यांनी सांगितले की, कोलकाता येथे जाणारी सर्व उड्डाणे सुरू आहेत. तसेच वाढत्या मागणीमुळे अतिरिक्त उड्डाणे चालविण्यात येत आहे. मात्र ट्रॅव्हल एजंटच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या परिस्थितीमुळे पुढील काही दिवस विमान भाडे कमी होण्याची शक्यता नाही. कोलकाता विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंफाळहून सुटणारी सर्व उड्डाणे फूल आहेत आणि तिकिटाची मागणी लक्षणीय वाढली आहे.



दरम्यान, शहरातील परिस्थिती चिघळली आहे. अजूनही शहरात कुठेच इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. दुकानेही बंद असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रविवारी बाजारपेठा आणि दुकाने काही तास खुली होती, परंतु या काळात लोकांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या होत्या आणि फक्त विमान तिकीट असलेले लोक घराबाहेर पडत होते.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व