हैदराबादचा राजस्थानला जोरका झटका

४ विकेट राखून मिळवला थरारक विजय


जयपूर (वृत्तसंस्था): जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला आयपीएल २०२३चा ५२वा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत कमालिचा रंगला. अटीतटीच्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत हैदराबादने ४ विकेट राखून राजस्थानवर थरारक विजय मिळवला. हैदराबाद संघाने या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुणतालिकेतील तळातील संघ सनराईजर्स हैदराबादने राजस्थानला पराभवाचा धक्का दिला. राजस्थानच्या २१५ धावांचे आव्हान पार करताना हैदराबादने सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेचला होता. हैदराबादला विजयासाठी १ चेंडू आणि ५ धावांची गरज असताना संदीप शर्माने अब्दुल समादला झेलबाद केले. मात्र त्यानंतर लगचे नो बॉलचा सायरन वाजला. हा सायरन फक्त नो बॉलचा राहिला नाही तर तो राजस्थानच्या पराभवाचा भोंगा देखील ठरला. आधीच्या चेंडूवर मैदान सोडलेल्या अब्दुल समादने एका चेंडूत ४ धावांची गरज असताना षटकार मारतच हैदराबादला रोमहर्षक सामना जिंकून दिला.



तत्पूवर्प, राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध २० षटकात २ फलंदाजांच्या मोबदल्यात २१४ धावा केल्या. राजस्थानकडून सलामीवीर जॉस बटलरने ९५ धावांची खेळी केली तर संजू सॅमसनने ६६ धावा ठोकत संघाला २०० पार पोहचवले. यशस्वी जैसवालनेही १८ चेंडूत ३५ धावांची खेळी करत राजस्थानला चांगली सुरूवात करून दिली होती.



जोस बटलरची झंझावाती फलंदाजी आणि संजू सॅमसनची कर्णधाराला साजेशी खेळीच्या बळावर राजस्थानने निर्धारित २० षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात २१४ धावांपर्यंत मजल मारली. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानावरील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. जोस बटलर याने ९५ धावांची खेळी केली. तर संजू सॅमसन याने नाबाद ६६ धावांचे योगदान दिले. हैदराबादला विजयासाठी २१५ धावांचे आव्हान दिले.



राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांनी वादळी सुरुवात केली. खासकरुन यशस्वी जायस्वाल याने फटकेबाजी केली. जोस बटलर याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. पावरप्लेमध्ये यशस्वी जायस्वाल याने चौफेर फटकेबाजी केली. जयस्वाल याने १८ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. जयस्वाल आणि बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागिदारी केली.



यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर बटलर याने आक्रमक रुप घेतले. हैदराबादच्या गोलंदाजांचा बटलर आणि सॅमसन यांनी समाचार घेतला. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. संजू सॅमसन याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. बटलर याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. संजू सॅमसन आणि जोस बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८१ चेंडूत १३८ धावांची भागिदारी केली. अखेरीस भुवनेश्वर कुमारने जोस बटलरची खेळी संपुष्टात आणली. जोस बटलर याचे शतक थोडक्यात हुकले.



जोस बटलर याने ९५ धावांची खेळी केली. फक्त पाच धावांनी बटलरचे सहावे शतक हुकले. बटलरने आतापर्यंत पाच शतके लगावली आहेत. भुवनेश्वर कुमार याच्या अप्रतिम चेंडूवर जोस बटलर बाद झाला. बटलरने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. पहिल्या २० चेंडूवर बटलरने फक्त २० धावा केल्या होत्या. त्यानंतर जोस बटलर याने आक्रमक रुप धारण केले. बटलरने मैदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी केली. बटलरने ५९ चेंडूत ९५ धावांची खेळी केली. या खेळीत बटलरने १० चौकार आणि चार षटकार लगावले.



जोस बटलर बाद झाल्यानंतर संजू सॅमसन याने राजस्थानचा डाव २०० च्या पुढे नेहला. संजू सॅमसन याने सुरुवातीपासूनच वादळी फलंदाजी केली. संजू सॅमसन याने ३८ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. या खेळीत संजू सॅमसन याने पाच षटकार आणि चार चौकार लगावले. संजू सॅमनच्या वादळी खेळीमुळे राजस्थानने २१४ धावांपर्यंत मजल मारली. शिमरोन हेटमार याने नाबाद सात धावांची खेळी केली. हैदराबादकडून एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही.

Comments
Add Comment

India vs Oman: टीम इंडियाने ओमानला हरवले, मात्र विकेटसाठी भारताच्या गोलंदाजांना थकवले

अबुधाबी: आशिया कप २०२५चा ग्रुप स्टेजमध्ये शेवटचा सामना आज भारत आणि ओमान यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात

ICC महिला विश्वचषक 2025: श्रेया घोषालच्या आवाजात ‘ब्रिंग इट होम’ थीम सॉन्ग प्रदर्शित!

मुंबई : महिला क्रिकेटमधील सामर्थ्य, एकता आणि थांबवता न येणाऱ्या जिद्दीचा उत्सव साजरा करत, इंटरनॅशनल क्रिकेट

Asia cup 2025: आज ओमानविरुद्ध भारताचा सामना, प्लेईंग ११मध्ये होऊ शकतात हे बदल

अबुधाबी: आशिया कप २०२५ मध्ये भारताने 'सुपर-४' फेरीसाठी आधीच पात्र ठरल्यामुळे, आज ओमानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात

आशिया कप २०२५: सुपर-४ चे संघ ठरले, पाहा असे असेल वेळापत्रक

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. ग्रुप स्टेजमधील थरारक सामन्यांनंतर

६,६,६,६,६- श्रीलंकेविरुद्ध अफगाणच्या या क्रिकेटरने केली कमाल

अबू धाबी: आशिया कप २०२५ मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील 'करो वा मरो' सामन्यात अफगाणिस्तानचा अनुभवी

नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला मैदानात दिला नाही भाव

मुंबई: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५मध्ये आज भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये सगळ्यांच्या नजरा नीरज