पश्चिम रेल्वेतर्फे ३ उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई सेंट्रल-बरौनी जंक्शन, अहमदाबाद-दरभंगा, अहमदाबाद-समस्तीपूर दरम्यान धावणार


मुंबई (प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या सुट्टीत होणारी जादा गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल - बरौनी जंक्शन, अहमदाबाद - दरभंगा आणि अहमदाबाद - समस्तीपूर जंक्शन दरम्यान तीन विशेष साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


गाडी क्रमांक ०९०६१/०९०६२ ही उन्हाळी विशेष मुंबई सेंट्रल ते बरौनी दरम्यान धावेल. ही विशेष गाडी मुंबई सेंट्रल येथून दर मंगळवारी सकाळी ११ वाजता सुटेल आणि गुरुवारी सायंकाळी ६ वाजता बरौनी जंक्शनला पोहोचेल. ही गाडी ९ मे ते ४ जुलैपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे गाडी क्र. ०९०६२ बरौनी जंक्शन ते मुंबई सेंट्रल ही विशेष ट्रेन बरौनी जंक्शन येथून दर शुक्रवारी रात्री १०.३० वाजता सुटेल आणि रविवारी संध्याकाळी ६.२० वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. ही गाडी १२ मे ते ७ जुलैपर्यंत धावेल. ही गाडी बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, गंगापूर सिटी, भरतपूर, अछनेरा, मथुरा, कासगंज, फारुखाबाद, कानपूर सेंट्रल, लखनऊ, सुलतानपूर, जौनपूर शहर, वाराणसी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पाटलीपुत्र आणि हाजीपूर स्थानकात दोन्ही दिशेला थांबेल.


तर गाडी क्रमांक ०९४२१/०९४२२ ही उन्हाळी विशेष अहमदाबाद - दरभंगा दरम्यान धावेल. ही गाडी अहमदाबादहून दर सोमवारी सायंकाळी ४.१० वाजता सुटेल. ही गाडी ८ मे ते २६ जूनपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०९४२२ दरभंगा-अहमदाबाद स्पेशल दरभंगा येथून दर बुधवारी सायंकाळी ६ वाजता सुटेल आणि गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता अहमदाबादला पोहोचेल. ही गाडी १० मे ते २८ जून दरम्यान धावेल. ही गाडी महेसाणा, पालनपूर, अबू रोड, फलना, मारवाड जंक्शन, बेवार, अजमेर, किशनगड, जयपूर, बांदीकुई जंक्शन, भरतपूर, अछनेरा जंक्शन, यमुना ब्रिज, तुंडला जंक्शन, इटावा, कानपूर सेंट्रल, उन्नाव, लखनऊ, गोंडा, गोरखपूर, नरकटियागंज, रक्सौल आणि सीतामढी स्टेशन येथे थांबेल.


गाडी क्रमांक ०९४१३/०९४१४ ही अहमदाबाद - समस्तीपूर स्पेशल दरम्यान धावेल. ही गाडी अहमदाबादहून दर मंगळवारी सायंकाळी ४.३५ वाजता सुटेल. ही गाडी ९ मे ते २७ जून २०२३ दरम्यान धावेल. गाडी क्रमांक ०९४१४ समस्तीपूर जंक्शन येथून दर गुरुवारी सकाळी ८ . १५ वाजता सुटेल आणि अहमदाबादला दर शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी ११ मे ते २९ जून दरम्यान धावेल. ही गाडी वडोदरा, सुरत, नंदुरबार, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी जंक्शन, पं. दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा, पाटणा जं. बरौनी स्टेशन या स्थानकांवर थांबेल.


गाडी क्रमांक ०९०६१, ०९४२१ आणि ०९४१३चे बुकिंग ६ मे पासून सर्व पीआरएस काउंटरवर आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सुरू होईल. वरील गाड्या विशेष भाड्यावर विशेष ट्रेन म्हणून धावतील, असे पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

Comments
Add Comment

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ

CSMT परिसरात सापडलेल्या त्या बॅगेत नेमकं काय सापडलं ?

मुंबई : देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेची परिस्थिती अधिक ताणलेली असताना, मुंबईत आज पुन्हा एकदा संशयास्पद

मुंबईत मागील वर्षभरात कृष्ठरोगाचे ६२० नवीन रुग्ण

येत्या १७ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत कृष्ठरोग शोध अभियान, सुमारे ४९ लाख नागरिकांची होणार तपासणी मुंबई (खास

घाटकोपर झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग खुला

आणखी ३७ बांधकामांवर महापालिकेची कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीचं कारण जगजाहीर...

मुंबई : देशभरात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Election) प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर

Dharmendra Hospital Video Leak : अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत क्रिटिकल; हॉस्पिटलमधील VIDEO लीक, पत्नी प्रकाश कौर ढसाढसा रडल्या

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या नाजूक प्रकृतीमुळे संपूर्ण सिनेसृष्टीत चिंतेचे वातावरण असतानाच,