नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान होत असतानाच आजपासून बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार चेन्नई आणि लगतच्या भागांमध्ये त्याचे वादळात रुपांतर होऊ शकते. एक ते दोन दिवसात ते अधिक धोकादायक बनण्याची शक्यता आहे. येमेनमधील एका शहराच्या नावावरुन या देशाने या वादळाला ‘मोचा’ असे नाव दिले आहे.
‘मोचा’ चक्रीवादळ भारताच्या दक्षिण किनारपट्टीच्या भागातून, ओडिशा आणि आग्नेय गंगेच्या पश्चिम बंगालमधून पुढे जाईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केवळ देशाच्या पूर्व भागातच पाऊस पडणार नाही, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये पुढील ४ दिवस हवामान खराब राहू शकते.
७ मे रोजी बंगालच्या उपसागराच्या आग्नेय आणि लगतच्या भागात ४० ते ६० किमी ताशी वेगाने वारे वाहू शकतात. ८ मे रात्री वाऱ्याचा वेग ७० किमी ताशी आणि १० मे पासून ८० किमी ताशी इतका वाढू शकतो.
मच्छिमारांना पुढील ४ दिवस समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. ‘मोचा’ वादळाचा ७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये प्रभाव दिसून येईल. ८ आणि ९ मे रोजी त्याची तीव्रता वाढवण्याची शक्यता आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…