‘ऑपरेशन कावेरी’चा विजय; सुरक्षेचा गंभीर प्रश्न सुटला!

नवी दिल्ली : भयंकर रक्तपात सुरू असलेल्या सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘ऑपरेशन कावेरी’ ही मोहीम राबविण्यात आली होती. याअंतर्गत वायुसेनेच्या १७ विमानांनी आणि भारतीय नौसेनेच्या ५ जहाजांनी ३ हजार ८६२ भारतीयांना मायभूमीत सुखरुप परत आणले आहे.

भारतीय वायुसेनेचे के. सी १३० हे विमान शुक्रवारी भारतीयांना घेऊन परत आले. त्याचबरोबर भारताच्या 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत सुदानमधून ३ हजार ८६२ नागरिकांना सुखरुप मायदेशात आणले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना दिली.

भारतीय वायुसेनेची विमाने सौदीच्या जेद्दाह शहरात, तर नौदलाची विनाशिका सुदानच्या बंदरात दाखल करुन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. २४ एप्रिल रोजी सुरु झालेली ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करुन भारतीय वायुसेनेचे शेवटचे विमान ४७ प्रवाशांना घेऊन शुक्रवारी ५ मे रोजी मायभूमीत परतले आहे. अवघ्या दहा ते बारा दिवसांत तीन हजारहून अधिक भारतीयांना सुखरुप आणण्यात भारत यशस्वी झाला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सातत्याने या मोहिमेवर लक्ष ठेवून होते.

ऑपरेशन कावेरीबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, "ऑपरेशन कावेरीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांच्या धैर्याचे कौतुक आहे. खार्तूम येथील भारताच्या दूतावासाने या कठीण काळात चांगले सहकार्य केले आहे. सौदी अरेबियात तैनात टीम इंडिया आणि भारताशी समन्वय साधणाऱ्या MEA रॅपिड रिस्पॉन्स सेलचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात सर्व भारतीयांच्या घेतलेली सुरक्षेची जबाबदारी आणि त्याची वचनबद्धता हीच आमची प्रेरणा असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेच्या १७ विमानांनी सूदान मधून उड्डाण करत सौदी अरेबियाच्या जेद्दा विमानतळापर्यंत भारतीयांना सुखरुप पोहचवण्यासाठी जवळपास पाच फेऱ्या मारल्या आहेत. सुदानच्या सीमेवर असणाऱ्या देशातून जवळपास ८६ भारतीयांना परत आणण्यात आले आहे. तसेच जे भारतीय नागरिक सुखरुप सौदी अरेबियामध्ये पोहचले त्यांना आवश्यक ती मदत केल्यामुळे भारताने सौदी अरेबियाचे देखील आभार मानले आहेत.

भारताने फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, संयुक्त अरब या देशांचे देखील आभार मानले आहेत. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे बचाव कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी सौदी अरेबियात उपस्थित होते. याबद्दल परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मुरलीधरन यांचेही कौतुक केले.
Comments
Add Comment

Krishna Heritage Tower : भारतात उभे राहणार ४३० फुटांचे सर्वात उंच आध्यात्मिक स्थळ; लवकरच साकारणार 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर'

हैदराबाद : आपले गजबजलेले रस्ते, शतकानुशतके जुने वास्तूशिल्प आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली