जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आलेले पर्यटक नाराज

मुरूड : जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. कोरोना काळामुळे गेल्या दोन वर्षांपासून किल्ला पाहण्यासाठी बंद केला होता. या काळात किल्ल्यातील अंतर्भागातील माहिती देणारे स्थानिक गाइड हे पर्यटकांकडून वाट्टेल तसे पैसे उकळत होते. सदर वृत्त प्रसिद्ध होताच शासनाने अशा गाइड्सवर बंदी आणली. कोरोना काळानंतर पुन्हा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. यावेळी मात्र किल्ला पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांना आत किल्ल्याची माहिती देणारे गाइड नसल्याने माहिती शिवाय परतावे लागत आहे.


जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पुरातत्व विभागाकडून प्रवेश कर आकारला जातो. लाखों पर्यटकांचा करोडो रुपयांचा कर शासनाला मिळत आहे. तरीही पुरातत्व विभागाकडून या किल्ल्याची माहिती मिळावी अशी कोणतीही सोय केलेली नाही. तरी या किल्ल्यावर शासनाने अधिकृत गाइड नेमावे व त्यांना अधिकृत माहिती कर आकारणी करावी. तसेच किल्ल्याच्या आत मार्गदर्शक फलक लावण्यात यावे व प्रत्येक ठिकाणी माहिती फलक लावावे अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.


किल्ल्यातील इतिहास कळत नसल्याने माहिती शिवाय परत जावे लागते आहे. या ठिकाणी माहिती फलक व मार्गदर्शक फलक लावावे नाहीतर अधिकृत गाइड नेमावे अशी आमची मागणी आहे. - श्रीकांत फुटाणे शिक्षक, पाथर्डी, अहमदनगर

या किल्ल्याला बाहेरून पाहण्याची व्यवस्था करावी जेणेकरून किल्ला बाहेरून पाहता येईल, कारण आतील माहिती मिळत नाही. जर शासन प्रवेश कर आकारणी करत आहे तर किल्ल्याची माहिती मिळण्याची व्यवस्था करावी. - मनोज वाघ, कल्याण

Comments
Add Comment

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची

NMIA : नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईतील कनेक्टिव्हिटी झाली मजबूत

नवी मुंबई विमानतळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (NMIA) केवळ हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातच नव्हे, तर

Bharat Gogawale : १५ ऑगस्टला रायगडमध्ये मीच झेंडा फडकवणार!

- मंत्री भरत गोगावले; येत्या २४ तासांत पालकमंत्री म्हणून घोषणा होणार असल्याचा दावा मुंबई : महायुती सरकारमध्ये

Majha Dusrikade Hay Suru : 'माझं दुसरीकडं हाय सुरू' गाण्यावर रील करणारे ST महामंडळाचे कर्मचारी ३ दिवसांच्या निलंबनानंतर पुन्हा सेवेत, सेवेत येताच केला नवा Video

पनवेल : राज्य परिवहन विभागाच्या गणवेशात वैयक्तिक प्रसिद्धीसाठी रील / शॉर्ट व्हिडीओ करण्यास बंदी आहे. या बंदीचे

Maha Rojgar Melava : पनवेलमध्ये ‘महारोजगारमेळावा २०२६’ला हजारोंचाउत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचासहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ

पनवेल : रोजगाराच्या शोधात असलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छिणाऱ्या हजारो युवक-युवतींसाठी पनवेलमध्ये

MLA Prashant Thakur : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंचे वाटप

पनवेल : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त