रस्ते बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा एसटीला फटका!

> मुरुड आगारातील बंद फेऱ्यांमुळे प्रवाशांचे हाल


> पर्यटकांची संख्या रोडावल्याने हॉटेल, पटरी, स्टॉल, रिक्षावाल्यांचा व्यवसायही थंडावला


मुरूड : मुरूड अलिबाग मार्गावर असलेल्या साळाव पुलाच्या दुरुस्तीमुळे मुरूड आगाराची एसटी सेवा बंद पडली आहे. त्यामुळे मुरुड तालुक्यातील असंख्य प्रवाशांचे हाल झाले आहेत. यामधून काहीतरी मार्ग काढा अन्यथा जनतेसाठी जन आंदोलन करु, असा इशारा पद्मदुर्ग कल्याणकारी व्यावसायीक मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.


साळाव पुलाचे डागडुजीचे काम चालु आहे. ही बाब गरजेची आहे. त्यात शंका नाही. पण हे सर्व करत असताना प्रवाशांचे व पर्यटकांचे खूप हाल होत आहे. मुरूड डेपोतील एसटी बसेस व कर्मचारी वर्ग अलिबाग डेपोत वर्ग केल्यामुळे मुरूड डेपोत एसटी बसेस व कर्मचारी वर्गाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे प्रवाशांची व पर्यटकांची गैरसोय होत आहे.


त्यात मुरूड डेपोतील कुठलीही गाडी वेळेत नसते. तसेच गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे गाडी जेव्हा येईल तेव्हा निघेल, असे प्रवाशांना सांगितले जाते. दोन-तीन तास वाट बघावी लागते. या अशा पध्दतीने गाड्या लेट होत राहिल्या तर प्रवाशांनी प्रवास कसा करायचा.


मुरूड मधील एसटी बसेसची संख्या कमी झाल्यामुळे मुरुड बोरीवली ही एकच गाडी असून ती भालगांव मार्गे जाते. साळाव चणेरा मार्गे एकही गाडी नाही. मुरूड मुलुंड ही संध्याकाळची गाडी बंद केली आहे. ३:३० ची गाड़ी बंद गेल्यानतंर मुरूड डेपोतून ५:३० ची एकच गाडी आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मुरूड हे पर्यटन स्थळ असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु एसटी फे-या कमी झाल्यामुळे मुरुड जंजिरा येथे पर्यटक येत नाहीत. त्यामुळे पर्यटकांवर अवलंबून असणारे छोटे-मोठे व्यावसायिक, हॉटेल, स्टॉल, रिक्षावाले यांच्या व्यवसायावर खुप मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम झाला आहे.


या विषयावर गांभीर्याने चर्चा करावी आणि यातून लवकर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा पद्मदुर्ग कल्याणकारी व्यावसायिक मंडळाच्या वतीने अध्यक्ष अरविंद गायकर यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी

‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाला.

ॲमेझॉन एअर ने आता ५ पट वेगाने डिलिव्हरी होणार

नवी दिल्ली : ॲमेझॉन एअरची ईशान्य भारतात सेवा विस्तारत असल्याची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत नवीन कार्गो मार्ग हे

Health Tips : ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास 'या' गोष्टींकडे अजिबात नका करू दुर्लक्ष, अशी घ्या आरोग्याची काळजी

जर तुम्हाला हाई ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे योग्य वेळी

Television Actress : टेलिव्हिजनवर झळकणाऱ्या 'या' अभिनेत्री घेतात बॉलिवूड अभिनेंत्रीपेक्षा जास्त मानधन; कमाई ऐकून व्हाल थक्क

अनेकदा आपल्या असं वाटतं की बॉलिवूड अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकतात त्यामुळे त्यांची कमाई फार जास्त असते.