'द केरला स्टोरी' चित्रपट करमुक्त करा

जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने हा चित्रपट पहाण्याचे सकल हिंदू समाजाकडून महिलांना आवाहन


नगर, शिर्डी : भारतात 'लव जिहाद' या दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदू मुलींचे वास्तव चित्रण करणारा 'द केरला स्टोरी' हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी विविध संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे.


हा चित्रपट राज्यात करमुक्त केल्यास 'द केरला स्टोरी' या सिनेमामधील हिंदू समाजावरील मुलींवर जिहादी मानसिकता असणाऱ्या लोकांनी अनन्वित अत्याचार करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करून आयुष्यातून कशा पद्धतीने उध्वस्त केले जाते, याचे योग्य आणि खरे चित्रीकरण प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला पाहता येईल. 'द केरला स्टोरी' हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक पाहता यावा. याकरिता हा चित्रपट लवकरात लवकर करमुक्त करावा अशी विनंती नगर जिल्हा शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर आदी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.



गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यात लव्ह जिहादचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन मोर्चे निघू लागले आहेत. तसेच 'लव जिहाद' घटनांना कधीतरी मोठ्या प्रमाणात वाचा फोडण्यात येत असून हिंदू समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर दिसू लागला आहे. या विषयावर बोलताना सुद्धा नेतेमंडळी कधी काळी घाबरत होते. विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करताना पोलीस अधिकारी देखील याकडे नेहमीच दुर्लक्ष करताना दिसून येत होते. त्यामुळे 'लव्ह जिहाद'चे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढताना दिसत होते.


तसेच राज्यात लव्ह जिहाद कायदा व्हावा यासाठी मागणी होत असून विधिमंडळ अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडण्यात आला होता. पीडित हिंदू मुली आता समोर येऊ लागल्या असून आपबीतीचे कथन करू लागले आहेत. आपल्या सरकारच्या काळात तरी आता आम्हाला न्याय मिळेल अशी आशा त्यांना वाटू लागली आहे. राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली 'लव्ह जिहाद'ला आळा बसेल आणि पीडित हिंदू मुलींना न्याय मिळेल अशी अपेक्षा आता प्रत्येकजण करू लागले आहेत.


'द केरला स्टोरी' या हिंदी चित्रपटामुळे तर याचे वास्तव आता खऱ्या अर्थाने उजेडात आले आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त हिंदू बांधवांपर्यंत पोहोचवा. यासाठी नगर जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने खास करून महिला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असताना दिसत आहेत.


सदर चित्रपट प्रत्येकाने पहावा हा उद्दात हेतू लक्षात घेऊन राज्य सरकारने या चित्रपटाला करमुक्त करावे, अशी माफक अपेक्षा सर्व हिंदू समाज बांधवांमधून व्यक्त होताना दिसत असून आपल्या नेतृत्व व कर्तृत्वामुळे हा चित्रपट नक्कीच करमुक्त होईल. जास्तीत जास्त हिंदू बांधव बघतील अशी अपेक्षा या माध्यमातून सकल हिंदू समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात येत असून नक्कीच आपण या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तो तुम्ही हा प्रश्न मार्गी लावाल, अशी अपेक्षा यावेळी निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भिडे पुलाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

पुणे : मेट्रोच्या कामांमुळे बंद ठेवलेला भिडे पूल आता वाहतुकीकरिता सुरू करण्यात आला आहे. शनिवार ११ ऑक्टोबरपासून

खामला निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, महसूलमंत्र्यांच्या धाडीनंतर अधिकारी निलंबित

नागपूर : राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहेत. नागपूरच्या खामला

Kondhwa Search Operation : एटीएसचा कोंढव्यात शिरकाव! गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, पोलीस तपास सुरू

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसर आज पहाटेपासूनच तपास यंत्रणांच्या छापामारीमुळे चर्चेत आला आहे. तपास यंत्रणांची

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात