कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी बारसू येथील दौऱ्यासाठी टिळकनगर, गोवंडी या भागातल्या गुंडांना फोन करून कोकणात जायचे असल्याचे कळविले आहे. रिफायनरी विरोधासाठी येत असताना उद्धव ठाकरे यांना हत्यार बंद गुंड का आणावे लागत आहेत? नामचित गुंड जे मोक्का, ३०२ मध्ये आरोपी आहेत. अशा गुंडाच्या संरक्षणात उद्धव ठाकरे रत्नागिरी बारसूत येणार आणि येथील शांतता बिघडवणार. तसा उबाठा सेनेचा प्लान असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला, तर संस्काराची भाषा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना लहान मुले का लागतात? लहान मुलांच्या एनजीओ सोबतचे संबंध का टिकून ठेवावे लागतात? आणि बाल आयुक्तांकडे जेव्हा तक्रार झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांना फोन करून आदित्य यांचे नाव का वगळावे लागले हे मला सांगण्याची वेळ आणू नका. जर आदित्य ठाकरेंवर चांगले संस्कार झाले असते तर आमची भगिनी दिशा सालियान आज जिवंत असली असती. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी संस्काराची भाषा करू नये, अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी सुनावले.
कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांची आमदार नितेश राणे यांनी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, संजय राजाराम राऊत हे पूर्ण नाव किती लोकांना माहिती आहे? स्वतःचा बाप कधी सांगायचा नाही आणि दुसऱ्याचे बाप काढायचे ही उबाठा सेनेच्या खासदार राऊत यांची वाईट सवय आहे. तुम्ही कोणाचे कुंकू लावता ते तरी सांगा. तुम्ही कोणाचे सिल्वरओकचे की मातोश्रीचे ते एकदा सांगा.
संजय राऊत हे नेहमीच भांडणे लावण्यात पटाईत आहेत. बाळासाहेबांच्या मुलाखती दरम्यान त्यांनी एक प्रश्न व्यक्तिगत आयुष्यावर विचारला. मॉसाहेब आणि बाळासाहेब यांच्यात भांडणे लावून विष कालवण्याचा प्रयत्न केला. असाच प्रयत्न राजसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडण लावून केला गेला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांची गाडी फोडली, ती का फोडली? तर संजय राऊत आणि त्यांची टोळी उद्धव – राजमध्ये आग लावत होती. आता याच संजय राऊत यांनी पवार कुटुंबात भांडण लावण्याचे काम सुरू केले. त्यावर अजित दादांनी राऊत यांची लायकी दाखवली.
आदित्य आणि तेजस ठाकरे या भावांमध्ये राऊत यांनी भांडणं लावली…
“संजय राऊतने युवा सेना प्रमुख पदावरून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे या दोन भावांमध्ये भांडणं लावली आहेत. महाविकास आघाडीत आदित्य ठाकरेचं प्रस्थ वाढू लागलं आहे. तर शिवसेनेत आदित्य, त्याची नाईट लाईफ गँग आणि वरुण सरदेसाईचा प्रभाव वाढतोय. हे लोक ताकदीने वाढताहेत हे संजय राऊतच्या लक्षात आल्यावर त्याने आणि त्याच्या टोळीने आदित्य ठाकरे विरोधात षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला. सामना या मुखपत्राचा वापर करून त्याने आदित्य आणि तेजस ठाकरेंमध्ये भांडणे लावली. रागाने तेजस ठाकरे कर्जतच्या फार्म हाऊसवर राहायला गेला. मी उद्धव ठाकरेंना सांगेन, तुमच्या दोन्ही मुलांना एकत्र ठेवायचे असेल तर संजय राऊतना घरात घेणे बंद करा. हा तिथेही आग लावण्याच्या तयारीत आहे, असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी दिला.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…