नितेश राणे यांच्या प्रश्नांवर उबाठा सेनेने उत्तर द्यावे : बावनकुळे

कणकवली (वार्ताहर) : आमदार नितेश राणे हे मुख्य प्रवक्ते म्हणून अभ्यासपूर्ण आणि अचूक बोलतात. आमदार नितेश राणे यांनी जी काही माहिती सांगितली असेल ती माहिती खरी असेल, तर त्याचे उत्तर उबाठा सेनेने आणि संजय राऊत यांनी द्यावे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.



आमदार नितेश राणे यांनी आरोप केला आहे की, उद्धव ठाकरे आजारी होते, तेव्हा आदित्य ठाकरे यांनी बैठका घेतल्या. मुख्यमंत्री होण्यासाठी आदित्य ठाकरे यांना महाविकास आघाडीने विरोध केल्यामुळे माघार घेतली. नितेश राणे कधीही चुकीच्या माहितीच्या आधारावर बोलत नाहीत. त्यांनी दिलेली माहिती खरीच असते, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रत्येक मुद्द्याचे माध्यमांशी बोलताना समर्थन केले. ते म्हणाले, आमदार नितेश राणे यांना आता मुख्य प्रवक्ते केले आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला नितेश राणे आता मुख्य प्रवक्ते म्हणून उत्तर देणारच. नितेश राणे यांनी जी काही माहिती सांगितली असेल, ती माहिती खरी असेल. त्याचे उबाठा सेनेने आणि संजय राऊत यांनी उत्तर द्यावे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.