माथेरानमध्ये भरलाय निसर्गाचा रंगोत्सव…

माथेरान : वसंत पंचमी पासूनच वसंत ऋतूला सुरुवात झाली. तेव्हापासून निसर्ग मुक्तहस्ताने रंगांची उधळण करत असताना दिसतो. कुठे पळस फुलतो, काटेसावर बहरतो, रानमोगऱ्याची फुले निसर्गाच्या शृंगारात भर टाकतात आणि सुरू होतो जणू काही जवळपास महिनाभर किंवा त्याहीपेक्षा थोडा अधिक काळ रंगणारा निसर्गाचा रंगोत्सव…


रायगड जिल्ह्यातील निसर्गाचा वरदहस्त लाभल्रेले, निसर्गवैभवाची मुक्तहस्ताने उधळण झालेले, जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरानच्या डोंगर आणि शिवारामध्ये असेच काटेसावर, रानमोगरा आदी पुष्पवैभव दिमाखात नजरेस पडते, तर त्याचबरोबर अनेक वृक्षही पर्ण-फुलांनी आपला अवतार बदलू पाहतात. निसर्गात अनेक ठिकाणी आपण फुलांच्या वेगवेगळ्या रंगछटा, त्याचे वैभव पाहत असतो. सध्या असेच काहीसे दृश्य माथेरान आणि त्याच्या अवतीभवतीच्या निसर्गात गेल्या काही दिवसांपासून नजरेस पडते आहे. वृक्षांनी आपले रूपडे पूर्णतः पालटलेले दिसते आहे. हिरव्या गच्च असणाऱ्या झाडांमधून कोवळी पालवी धारण करून रंगीबिरंगी छटा दिवसागणिक नजरेस पडतात. आज पानझड, उद्या गुलाबी कोवळी पाने, परवा गडद लाल पाने, तर पुढे एकेक दिवस आणखी रंग बदलून पुन्हा आपल्या हिरव्या रंगाकडे मार्गक्रमण करत पाने आपली पूर्वावस्था धारण करतात. हा प्रवास निसर्गप्रेमींसाठी पर्वणी आणि नजरेस सुखावणारा ठरतो.


आपल्याला रस्त्याच्या कडेला, बागेत पिवळ्या झुपक्याचा बहावा दिसतो, कुठे जांभळ्या रंगाच्या कागदी फुलांचा ताम्हण लक्ष वेधतो, तर कुठे पांगारा, काटेसावर, विविधरंगी बोगनवेल अशी नानाविध प्रकारची फुलझाडे बहरतात व अवचित आपले लक्ष वेधून घेतात. पण माथेरानच्या डोंगर कुशीत, त्यांच्या अंगाखांद्यावर फुलांबरोबरच अनेक झाडांच्या पानांनी रंग भरलेला दिसून येतो, अशी माहिती माथेरानच्या सरस्वती विद्यामंदिर येथील मराठी भाषेचे अध्यापक संघपाल वाठोरे यांनी दिली आहे.


निसर्गाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. माणसांना जीर्ण झाल्यानंतर हळूहळू त्याचा प्रवास मृत्यूकडे होतो. मृत्यूनंतर त्यांना विधीपूर्वक निरोप दिला जातो. तसेच काहीसे निसर्गाचे कृत्य वाटते. जीर्ण झालेल्या पानांना कुठलीही इजा न होता हळुवारपणे आपल्यातून निरोप द्यायचा आणि आणि नव्याचे स्वागत करायचे तेही अगदी गळणाऱ्या पानाला दुःख न होता...

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.