
ठाणे (प्रतिनिधी) : राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘पीएम श्री योजना’ राबली जात आहे. या योजने अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १४ शाळांची निवड प्रथम टप्प्यात झाली आहे. निवड झालेल्या शाळांच्या भौतिक प्रकारच्या सर्व सुधारणांसाठी काम करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील ५ शाळा, महानगरपालिकातील ६ शाळा, नगरपालिका २, शहापुर नगरपंचायत १ अशा प्रकारे शाळांची निवड करण्यात आली आहे.
इमारत दुरुस्ती, नवीन वर्ग खोली, स्वच्छता गृह (मुली, मुले तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी), संरक्षण भिंत, सौर ऊर्जा, सायन्स लॅब, संगणक लॅब इत्यादी सर्व भैतिक सुविधासाठी शाळेच्या गरजेनुसार शासनाकडे प्रस्ताव सादरिकरण करण्यासाठी कारवाई सुरू आहे.
पीएम श्री योजनेअंतर्गत प्रथम टप्प्यात निवड झालेल्या शाळांची यादी :
- जि. प. शाळा डोहळेपाडा, भिंवडी
- जि. प. शाळा माणिवली, कल्याण
- जि. प. शाळा कोलठण, मुरबाड
- जि. प. शाळा शहापूर नं. १
- जि. प. शाळा वाशिद नं. १, शहापूर
- जि. प. शाळा काकडवाल, अंबरनाथ
- बदलापूर नपा, कुळगाव
- अंबरनाथ नपा ऑडिन्स फॅक्ट्री शाळा
- भिवंडी मनपा अवचित पाडा उर्दू हायस्कूल
- कल्याण मनपा तिसगाव शाळा नं. १८
- नवी मुंबई नमपा आंबेडकर नगर शाळा नं. ५५
- उल्हासनगर मनपा, शाळा नं. १२
- ठाणे मनपा शाळा नं. ६२
- मीरा-भाईंदर मनपा शाळा नं. २२