छत्रपती संभाजीनगर : सलग तिसर्या दिवशी गारपीट व अवकाळी पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे विविध घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. शेतीचे नुकसान, विजेच्या तारा पडून जीवितहानी झाली आहे.
अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील नांदेड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुर्घटना घडल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात मालटेकडी परिसरातील कामठा येथे वीज पडून शेख वजीर शेख चांद या ४५ वर्षीय तर जवाहरनगर तुप्पा येथे हिमाचलचे रहिवासी तारासिंग बाबूराम या ४० वर्षीय व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला. भिंत कोसळल्याने व्यंकटी लक्ष्मण दंडलवार या युवकाचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले. टीनपत्रावरील दगड अंगावर पडल्याने सोनुबाई नंदू पवार या ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात वीज पडून गणेश जहाने या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपीट झाली.
सांगोला येथे वावटळीमुळे लाकडी काठ्यांना बांधलेला कापडी पाळणा उडाला व त्यात ठेवलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दगडावर आपटून मृत्यू झाला. जळगावात वावटळीमुळे उभा कंटेनर कलंडून अभियंत्यासह दोन मजूर ठार झाले. गुरुवारी कंटेनरमधून लोखंडी पत्रे काढत असताना वावटळ सुरु झाली. त्यात पत्री शेड, पाच ते सहा दुचाकीही उडून गेल्या. याच वेळी भोला व चंद्रकांत हे दोन मजूर कंटेनरच्या आडोशाला जाऊन उभे राहिले. वावटळीत हा कंटेनर कलंडून दोघांच्या अंगावर कोसळून दोघेही जागीच गतप्राण झाले.
अशा दुर्घटना घडत असतानाच हवामान खात्याने पुढील आणखी काही दिवस मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…