आता नाकावाटे इन्कोव्हॅक कोरोना प्रतिबंधक लस

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतर्फे मुंबईकरांना २४ लसीकरण केंद्रांवर आता नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लस देण्यात येणार आहे. या कोरोना - १९ प्रतिबंधक लसीकरणाला आजपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. मात्र ६० वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, त्यांनी कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे.


पालिका कार्यक्षेत्रात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली होती. प्रारंभी प्राधान्य गटांचे व त्यानंतर १ मे २०२१ पासून १८ वर्षं वयावरील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले होते. कोरोना-१९ लसीची प्रतिबंधात्मक मात्रा १० जानेवारी २०२२ पासून देण्यात येत आहेत. २६ एप्रिलअखेरपर्यन्त,२ कोटी २१ लाख ९६ हजार ९९५ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली, दुसरी आणि प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात आली आहे.


महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २८ एप्रिलपासून इन्कोव्हॅक ही लस ६० वर्ष वयावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून देण्यात येणार आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येईल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून इन्कोव्हॅक लस देता येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील २४ ठिकाणी इन्कोव्हॅक लस स्थळ नोंदणी अर्थात ऑनस्पाट नोंदणीद्वारे देण्यात येईल.


Comments
Add Comment

BMC News : रुग्ण बनून सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष पोहोचले रात्री १२ वाजता केईएम रुग्णालयात

रुग्णालयातील परिस्थिती पाहून झाले हैराण अधिष्ठाता यांना दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश मुंबई : मुंबई

Mumbai Rain Update : IMDचा इशारा! मुंबईसह ११ जिल्ह्यांना पुढील ३ तासांसाठी यलो अलर्ट!

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) आज, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी नाऊकास्ट (Nowcast) इशारा जारी केला आहे. पुढील ३

Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित लाडक्या बहिणींच्या आरोग्याची तपासणी

मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये स्तन कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन वैद्यकीय क्षेत्रातील २ हजारांहून अधिक

Mumbai Trees : मुंबईतील झाडांच्या आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा

वृक्षतज्ज्ञ व अभ्यासक यांच्या समवेत प्रशासनाची सखोल चर्चा मुुंबई : मुंबईत विविध कारणांनी होणाऱ्या

Ritu Tawde : महापौरांकडून तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक

मुंबईत हॉटेल्स,डेरीसह इतर खानपान सेवांची भेसळीच्या अनुषंगाने होणार तपासणी मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त

Mumbai Mayor : त्यांनी पेंग्विन आणला, आम्ही सिंह आणणारच; महापौर स्वत: अधिकाऱ्यांसह गुजरातला जाणार

पेंग्विन खाली मान करून उभे असतात म्हणून पहायला आवडतात मुंबई : भायखळा येथील राणीबागेतील प्राणिसंग्रहालयात