Exclusive : नविन घर घेताय किंवा फ्लॅट बूक केला असेल तर हे नक्की वाचा...

महारेराकडे नोंदणीकृत असलेल्या मुंबई-ठाण्यासह राज्यातील


तब्बल ३०८ गृहनिर्माण प्रकल्पांवर दिवाळखोरीची टांगती तलवार


यात सुरू असलेल्या ११५ तर बंद पडलेल्या १९३ प्रकल्पांचा समावेश


महारेराला हे प्रकल्प राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या (NCLT) संकेतस्थळावर आढळले


मुंबई : मुंबई-ठाण्यासह राज्यातील तब्बल ३०८ गृहनिर्माण प्रकल्पांवर दिवाळखोरीची टांगती तलवार असून या यादीत मुंबई महानगरातील २३३, पुण्यातील ६३, अहमदनगर ५, सोलापूर ४ आणि रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि सांगली येथील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.



सर्वच प्रकल्पांच्या सूक्ष्म संनियंत्रणासाठी महारेराने पावले उचलायला सुरुवात केलेली आहे. यासाठी महारेरा विकासकांनी महारेरा संकेतस्थळावर अद्ययावत केलेल्या माहितीची छाननी तर करतेच याशिवाय इतर स्त्रोतांमधूनही प्रकल्पस्थिती समजून घ्यायचा सातत्याने प्रयत्न करते. अशी छाननी करताना महारेराकडे नोंदणीकृत असलेले तब्बल ३०८ प्रकल्प हे नादारी आणि दिवाळखोरीच्या (Insolvency and Bankruptcy) अनुषंगाने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या (National Company Law Tribunal- NCLT) संकेतस्थळावर असल्याचे आढळून आले आहे.


विविध बँका, वित्तीय संस्था, या क्षेत्रातील पतपुरवठा करणारे इतर घटक यांनी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणामार्फत राज्यातील या ३०८ प्रकल्पांवर नादारी आणि दिवाळखोरीची कारवाई सुरू केलेली आहे. यातील गंभीर बाब अशी की, या ३०८ प्रकल्पांपैकी ११५ प्रकल्प सध्या सुरू असलेले (Ongoing) असून यातील ३२ प्रकल्पांत ५० टक्के पेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे. तर उर्वरित १९३ प्रकल्प हे व्यापगत (Lapsed) असून यातील तब्बल १५० प्रकल्पांतही ५० टक्के पेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे. सुरू असलेल्या ८३ प्रकल्पांत आणि व्यापगत झालेल्या ४३ प्रकल्पांत ५० टक्के पेक्षा कमी नोंदणी झालेली असल्याचे दिसते.



ग्राहकांची होऊ शकते फसवणूक


महारेराच्या नियमानुसार, हे प्रकल्प महारेराकडे दर ३ महिन्याला प्रकल्पात किती नोंदणी खरेदी-विक्री झाली (Inventory) याची माहिती अध्ययावत करीत नसल्याने हे प्रकल्प याही स्थितीत नवीन ग्राहक स्वीकारत आहेत का, हे स्पष्ट होत नाही. या व्यवहारात पारदर्शकता असावी आणि ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांना सावध करण्यासाठी महारेराने ही समग्र यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. ग्राहकांनी ही यादी बघून याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन महारेराच्या वतीने ग्राहकांना करण्यात आले आहे.


या ३०८ प्रकल्पांपैकी सर्वात जास्त म्हणजे १०० प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील आहेत. यानंतर मुंबई उपनगरातील ८३, मुंबई शहरातील १५ प्रकल्प यात आहेत.


पुणे जिल्ह्यातीलही ६३ प्रकल्प या यादीत असून पालघर १९, रायगड १५, अहमदनगर ५ (अ.क्र. २९१ ते २९५), सोलापूर ४ (अ.क्र. १७९ ते १८२), छत्रपती संभाजीनगर (अ.क्र. १), रत्नागिरी( अ.क्र. २६९), नागपूर (अ.क्र. १४८) आणि सांगली (अ.क्र. २८४) या जिल्ह्यांतील एकेक प्रकल्पाचा या यादीत समावेश आहे.


या ३०८ प्रकल्पांपैकी ११५ हे सुरू असलेले (On going) प्रकल्प आहेत. या सुरू असलेल्या प्रकल्पांत ठाणे भागातील ५०, मुंबई उपनगर ३१, मुंबई शहर १०, पुणे आणि रायगड प्रत्येकी ८, अहमदनगर ५, पालघर २ आणि सोलापूरच्या एका प्रकल्पाचा यात समावेश आहे.


यातील व्यापगत( Lapsed) प्रकल्पांची संख्या १९३ असून यात पुणे ५५, मुंबई उपनगर ५२, ठाणे ५०, पालघर १७, रायगड ७, मुंबई ५, सोलापूर ३, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकल्पाचा यात समावेश आहे.

Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर : राज्य