Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरपशुधनाची संख्या रोडावल्याने पशुवैद्यकीय दवाखाने ओस

पशुधनाची संख्या रोडावल्याने पशुवैद्यकीय दवाखाने ओस

तालुक्यात औद्योगीककरण झाल्याने नोकरीधंद्यानिमित्त हजारो कामगार परराज्यांतून येथे आले आहेत. तसेच भिवंडी, ठाणे, कल्याण, मुंबई ही बाजारपेठ जवळ असल्याने नागरिकांना दूधदुभते पदार्थ लागत असल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकरी व धंदेवाल्यांनी गाई-म्हशींचे तबेले टाकले आहेत. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी गोट फॉर्म सुरू केले आहेत, त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाने तग धरून असल्याचे दिसून येत आहे.

वसंत भोईर
वाडा : तालुक्यातील अनेक खेडोपाड्यांतून जनावरांची संख्या कमी होत असल्याने पशुवैद्यकीय दवाखाने ओस पडत असल्याचे दिसून येत आहेत.

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. तालुक्यात विविध जातींच्या भाताच्या वाणाची लागवड शेतकरी करीत असतात. यासाठी प्रत्येक शेतकरी बैलजोडी, गाई, म्हशी सांभाळत असे. याच जोडीला शेळ्या, मेंढ्या, कोंबड्याही शेतकरी सांभाळत असत. मात्र यांत्रिकीकरणामुळे पॉवरटिलर, मोठे ट्रॅक्टर आल्याने शेतकऱ्यांनी हळूहळू पशुधन कमी करून पॉवरटिलर, मोठे ट्रॅक्टर घेतले. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही आहेत अशांनी जमिनीची चिखळणी, उखळणी अशी मशागत करण्यासाठी भाड्याने ट्रॅक्टर घेऊन मशागत करणे सुरू केले. त्यातच वर्षभर बैलजोडी व इतर जनावरांचा सांभाळ करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने तसेच खर्च परवडत नसल्याने जनावरे कमी करून यांत्रिक शेतीला पसंती दिली.

पंधरा-वीस वर्षांपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी बैलजोडी असायचीच. याचबरोबर दुभदुभत्यासाठी गाई-म्हशी असायच्या, प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी कोंबड्या, बकऱ्या असायच्या, त्यामुळे पशुधनाच्या उपचारासाठी विभागवार पशुवैद्यकीय दवाखाने शासनाने स्थापन केले आहेत. मात्र खेड्यापाड्यांत आजची परिस्थिती बदलली असून, गावोगावी हातावर मोजण्यासारख्याच शेतकऱ्यांच्या घरी जनावरे आहेत, त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखानेही ओस पडत असल्याचे दिसून येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -