पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी देणारा अटकेत

  167

राजीव गांधींसारखी अवस्था करण्याची दिली होती धमकी


केरळ : पंतप्रधान मोदींना धमकीचे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. झेवियर असे या व्यक्तीचे नाव आहे. झेवियरने केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, मोदींची अवस्था राजीव गांधींसारखी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिल रोजी केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत.


कोचीचे पोलीस आयुक्त सेतू रमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांना धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वैयक्तिक वैमनस्यातून शेजाऱ्याला अडकवण्यासाठी झेवियरने हे पत्र लिहिले होते.


झेवियरने पत्रावर एनजे जॉनी म्हणून स्वाक्षरी केली आणि खाली फोन नंबर लिहिला होता. पोलिसांनी जॉनीची चौकशी केली असता, त्याला पत्राबाबत काहीही माहिती नाही, पण शेजारी झेवियरशी भांडण झाल्याचे त्याने मान्य केले. एर्नाकुलममधील कथरीकाडावू येथील रहिवासी असलेल्या झेवियरला पोलिसांनी त्याच्या हस्ताक्षराची पडताळणी केल्यानंतर अटक केली.


पंतप्रधान कोचीला पोहोचण्यापूर्वी येथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. यासाठी २०६० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधानांच्या ये-जा करणाऱ्या मार्गावरील वाहतूक दुपारी २ वाजल्यापासून वळवण्यात येणार आहे.


आयुक्त पुढे म्हणाले, "पंतप्रधानांच्या रोड शोसाठी १५,००० लोक आणि युवम-२३ कार्यक्रमासाठी २०,००० लोक अपेक्षित आहेत. युवम-२३ मध्ये येणारे सहभागी फक्त मोबाईल फोन आणू शकतात."


केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान २५ एप्रिल रोजी तिरुअनंतपुरम ते कासारगोड दरम्यान केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. ही ट्रेन तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, पठानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड या ११ जिल्ह्यांना जोडेल. याशिवाय पंतप्रधान तिरुअनंतपुरममध्ये डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी करतील.

Comments
Add Comment

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या