मुंबईची प्रसिद्ध अभिनेत्री सेक्स रॅकेट प्रकरणी अटकेत

मुंबई : मागील काही दिवसांपुर्वी मुंबईत आरती मित्तल या अभिनेत्री-कास्टिंग डायरेक्टरला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यात आता आणखी एका अभिनेत्रीला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अटक केल्याने बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.


२४ वर्षीय भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीला मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री (२१ एप्रिल) अटक केली आहे. तिच्यावर मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे.


पोलिसांना त्याच्या खब-यांकडून वेश्याव्यवसायाची माहिती मिळाली होती. यानंतर सापळा रचत कारवाई करून गोरेगाव येथील आरे कॉलनीमधील रॉयल पाम हॉटेलवर छापा टाकण्यात आला, जिथे ही अभिनेत्री वेश्याव्यवसायासाठी अनेक मॉडेल्सचा पुरवठा करत होती.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारी ही मुंबईत सिनेमात करिअर करायला आलेल्या मॉडेल्सला हेरायची आणि या मॉडेल्सच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना वेश्या व्यवसायात ढकलायची. या कारवाईत पोलिसांनी तीन मॉडेल्सचीही सुटका केली आहे. पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.


सुमन कुमारी ही ५० ते ८० हजार रुपयांत मुली पुरवत होती. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा हॉटेलच्या खोलीत तीन मॉडेल्स संशयास्पद अवस्थेत सापडल्या.


दरम्यान, सुमन कुमारी हीने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. तिचे 'लैला मजनू' आणि 'बाप नंब्री, बेटा दस नंब्री' यांसारख्या काही भोजपुरी चित्रपट गाजले आहेत. अभिनेत्री असण्यासोबतच सुमन एक गायिका देखील आहे. तिने हिंदी, पंजाबी आणि भोजपुरीसह अनेक भाषांमध्ये गाणीही गायली आहेत.

Comments
Add Comment

परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.