संजय राऊतांविरोधात मुंबईत तक्रार दाखल

मुंबई : खारघरमध्ये पाण्याशिवाय श्रीसदस्यांना तडफडून मारले असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ५० श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून राऊत यांच्या या वक्तव्याविरोधात शिवसेनेने मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, किरण पावसकर यांनी मरिन लाईन्स पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. संजय राऊतांचे हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.


संजय राऊतांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला बूच बसले आहे. खारघरमध्ये ४० ते ५० मृत्यू झाले. त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाही. माणसांचे जीवन पैशाने विकत घेता येत नाही. बाहेर कुठे बोलू नका असा दबाव श्रीसदस्यांवर टाकला जात आहे. मृत्यू लपवण्यासाठी सरकार घरी जाऊन खोके देऊन त्यांची तोंडे बंद करत असल्याचा आरोप राऊतांनी केला.


खारघर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एकसदस्यीय समिती स्थापन केली आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य